गुजरातमधल्या गणदेवी गावात राहून भक्तांच्या हाकेला सदैव धावून जाणारी श्री जानकी आई. कुणी तिला जानकी आई म्हणतात तर कुणी बायजी. तिचं कुठे मंदीर नाही. आणि असायचं कारणही नाही कारण तिचं स्थान आहे आपल्या सर्वांच्या हृदयात. तिच्या कृपाप्रसादाने आजवर हजारो भक्तांना मायेची सावली मिळाली आहे आणि यापुढेही मिळतच राहिल. आजीची जीवनकहाणी सांगणार्या पोथीचंही नाव “सावली”च.