स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पांवस यांचे माहितीपूर्ण अँप्लिकेशन आहे.
कोकणातल्या निसर्गरम्य परिसरात पावस येथे राहून प.पू. ी्री स्वामीजींनी फार मोठे आध्यात्मिक आणि राष्ट्रीय कार्य केले. प्रसिद्धीपराङ्मुख स्वामींच्या दर्शनाची आस लागून अनेक भक्त पावस येथे येऊ लागले. १ ९ ६७ मध्ये सेवा मंडळ संस्था स्थापन झाली. --री स्वामीभक्तांच्या राहण्या - जेवण्याची उत्तम व्यवस्था १ ९ ६ ९ पर्यंत देसाई बंधू करत होते. स्यानंतर स्वरुपाश्रम सुरु झाला आणि १ ९ ७२ साली स्वरुपाश्रमाची नवीन इमारत बांधण्यात आली. स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर एक वर्षांनी कै.भाऊराव देसाई ह्यांचे देखरेखीखाली समाधी मंदिराचे बांधकाम झाले. समाधी मंदिराची सर्व व्यवस्था सेवा मंडळ संस्थेने उत्तम प्रकारे ठेऊन प.पू. स्वामींचे सर्व वाङ्मय आधुनिक काळानुसार ऑडिओ, व्हिडिओ सीडीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. ्वामींच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहचावी, अधिकाधिक भक्तांना याचा लाभ घेता यावा म्हणून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे हे अधिकृत मोबाइल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.