Maha MTB के बारे में
'मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिडिया' अशा स्वरूपातील सर्वप्रथम
महा MTB... मुंबई व जळगाव तरुण भारताचा संयुक्त उपक्रम !
निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’ ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये `Maha MTB APP` उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आजपासून तो आपल्या सेवेत रुजू होतो आहे.
आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीने झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढिगाने उपलब्ध आहे. मात्र त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहित आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
म्हणूनच `Maha MTB APP`, सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टिमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही `Maha MTB APP` व वेबसाइटची वैशिष्ट्ये असणार आहे.
मराठी पत्रकारितेत ‘मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिडिया’ (ऑडिओ, व्हिडिओ व टेक्स्ट) अशा स्वरूपातील सर्वप्रथम आणि वेगळी पायवाट पाडून देणारा, नवा ‘ट्रेंड सेट’ करणारे हे अॅप असेल असा आमचा विश्वास आहे.
पारंपारिक बांधीलकी जपत नवी भूमिका, दृष्टिकोन देणारी या पत्रकारितेच्या प्रवासात आपण सर्वजण नेहमीप्रमाणे आमच्यासोबत असाल या खात्रीसह आपण हा नवीन प्रवास सुरू करूया...
What's new in the latest 15.1.0
Maha MTB APK जानकारी
Maha MTB के पुराने संस्करण
Maha MTB 15.1.0
Maha MTB 15.0.0
Maha MTB 14.9.0
Maha MTB 14.8.0

APKPure ऐप के माध्यम से सुपर तेज़ और सुरक्षित डाउनलोडिंग
एंड्रॉइड पर XAPK/APK फ़ाइलें इंस्टॉल करने के लिए एक-क्लिक करें!