このGirnarについて
Girnarは教祖Dattatreya再生可能な住居です。
गिरनार हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान. जुनागढ, गुजराथस्तीत गिरनार डोंगर हा रेवतक पर्वत म्हणून देखील ओळखला जातो, गिरनार पर्वत शृंखला ही हिमालया पेक्षा देखील जुनी आहे. गिरनार हे अतिशय पवित्र स्थान हिंदू आणि जैन धर्मीय लोकांसाठी एक अतिशय महत्वाची धार्मिक यात्रा मानली जाते. गिरनार हे देवाधिदेव महादेव ह्यांच्या भक्तांसाठी देखील अतिशय महत्वाचे स्थान होय. गिरनार नवनाथ किंवा नाथ संप्रदाया साठी एक फार महत्वाचे स्थान आहे, इथेच गुरु गोरक्षनाथांची धुनी आहे आणि बर्याच नाथांना इथे स्वत दत्तगुरूंनी दीक्षा दिली आहे.
गिरनार बद्दल बर्च्याचश्या गूढ आणि रम्य गोष्टी आहेत, हिंदुन्करिता ही जागा अतिशय महत्वाची आणि पूज्य मानली जाते कारण ह्याच ठिकाणी श्री गुरु दत्तात्रेयांनी १२,००० वर्ष तपस्या केली. गुरु दत्तात्रेयांच्या चरण पादुका ह्याच ठिकाणी श्री गुरु शिखरावर आहेत. असे म्हणले जाते कि गुरु दत्त महाराजांचा सतत निरंतर वास आहे आणि त्यांनी ह्याचं ठिकाणी बर्याच भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देखील दिले आहे.