स्त्री सक्षमीकरणा कडेएक पाऊल
राजमाता जिजाऊ थोर क्रांतीकारी अहिल्याबाई होळकर, शांतीचे प्रतिक मदर तेरेसा, भारताचे भूषण माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, शुरवीर ताराराणी, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय नेमबाज कोल्हापूर जिल्ह्याची शान तेजस्वीनी सावंत अशा अनेक स्ञी शक्तीने महाराष्ट्र तसेच भारत मातेचे नाव समस्त विश्वात गाैरविले आहे.माता तू, जननी तू, तू आदिशक्ती.मानवाने स्ञी शक्तीला आजच्या आधुनिक युगात एक ओझ समजून धुडकावली.तिची भ्रुणहत्या करतो हे योग्य आहे का ?आजचा काळ बदलला आहे या आधुनिक युगात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक भागात स्ञीयांनी ठसा उमटविला .प्रत्येक कटू प्रसंगास ठामपणे उभे राहणे हे स्ञी शक्तीलाच शक्य आहे. राजमाता जिजाऊ यांच्या पाेटी जन्मलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि त्यांनी इंग्रजाबरोबर मुगलशाही नायनाट केला. तसेच गोर गरीब दिन दलितांच्या कल्याणासाठी आपले उभे आयुष्य वेचत काढलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आम्ही आपणापुढे मांडू इच्छितो.