एक चुकलेला रस्ता - भयकथा
आता २० डिसेंबर ची हि घटना… वेळ रात्रीचे ९.००.. ठिकाण नेरळ रेल्वे स्टेशन… रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची वर्दळ अगदीच कमी होती… पण नेरळहून पुढे काही पर्यटन स्थळं आहेत…तिकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनचालकांची मात्र भाऊगर्दी झाली होती… ६ अनोळखी मित्र..पहिल्यांदाच भेटलेले..एकमेकांच्या स्वभावापासून अगदीच अनभिज्ञ.. कोण कधी काय करेल किंवा काय करू शकतो याचा किंचितदेखील अंदाज नाही… मंगेश(मंग्या) च्या वाढदिवसासाठी भेटलेले… अचानक रोह्या(रोहित) ने overnight चा plan केला आणि किश्या(कृष्णा) ने तो overnight कुठे करायचा यावर शिक्का मारला.. माथेरान च्या आसपास कोथळगड नावाच्या एका किल्ल्यावर overnight करायचा बेत आखला गेला… हसीम ने त्यच्या मराठी शाळेची काच-कूच करीत करीत अखेर overnight करायचं मान्य केलं… सुब्या (सुबोध) ला काही पर्यायच नव्हता… त्यांनी नेरळस्टेशन ला जेवण केलं, खाण्यासाठी काही खाद्य सोबत घेतलं.. आता कोथळगड ला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यात खाजगी वाहनाने आणि उरलेल्या रस्त्यात रेल्वे track ने पायी जायचं ठरलं… पण कोथळगड नक्की कुठे आहे याबद्दल कोणालाच माहिती नव्हते..मग काय तोंड तर सोबत होतेच कि… त्यांनी तिथेच उभ्या असलेल्या वाहनचालकांना कोथळगडच्या च्या रस्त्याबद्दल विचारले असता वेग वेगळी उत्तरं मिळाली ती ऐकून ह्या ६ जणांच्या बोऱ्या उडाल्या…!! ६ हि जन full on confuse झाले…आता काय करायचे??? एवढ्यावर येऊन पुढचा plan रद्द तर करता येणार नव्हता. मग आता पुढे काय?? तरी कृष्णा ने, इतर चालकांपासून दूर उभ्या असलेल्या एका माणसाला कोथळगडाविषयी विचारले असता त्याने, तो गड माथेरान च्या डोंगरांमधून पुढे माथेरानच्याच विरुद्ध दिशेला असणाऱ्या डोंगरात आहे, असं अगदी ठामपणे सांगितलं. आता अशा द्विधा मनस्थिती मध्ये जी व्यक्ती ठामपणे बोलत असेल अशा व्यक्तीवर आपले मन लगेच विश्वास ठेवला.. त्यांनीदेखील हेच केलं.. त्या अनोळखी वाहनचालकावर अगदीच सहजतेने विश्वास ठेवला… आणि इथेच यांची फसगत झाली… ज्या वाहनचालकाने त्यांना कोथळगडाविषयी माहिती दिली त्याच्याच गाडीत हे ६ जण बसले आणि दंगा मस्ती करीत करीत गाडी घाट चढू लागली. रोह्या आणि सुब्या पुढे त्या चालकाजवळ बसले होते..रोह्या ची मस्ती चालली होती पण सुब्या मात्र अगदीच शांत बसला होता..त्याचं त्या वाहनचालकाकडे आणि त्याच्या हालचालीकडे एकदम बारीक लक्ष होतं. रोह्यानं सुब्याला २-३ वेळा गप्पा मारण्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला पण सुब्यानं रोह्याकडे रागाचा कटाक्ष टाकला..रोह्याला सुब्याच्या त्या कटाक्षात एक प्रकारची गोपनीयता दिसली आणि रोह्या घाबरून पूर्ण घाटात गप्प बसला.. सुब्याची शांतता म्हणजे जणू तो त्या चालकाकडून संमोहितच झाला होता, इतकि भयानक वाटत होती.. मधेच थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती… सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती कि, ‘आज रात्रभर full on धिंगाणा… खूप सारी मस्ती आणि खूप साऱ्या गप्पा-गोष्टी आणि बरेच काही… घाटात गाडी एकेक वळण घेऊन चढत होती. एक वळणावर चालकाने जोरदार ब्रेक मारून गाडी थांबवली. किशा आणि हसीम त्याला विचारू लागले काय झालं म्हणून??? त्याने दोघांकडे front rear mirror मधून पाहिलं…त्याची ती करडी नजर अनुत्तरीत होती.. त्याने मारलेल्या त्या जोरदार ब्रेकमुळे जणू सुब्याचं संमोहन भंग पावलं होतं आणि सुब्या जागा होऊन विचारत होता काय झालं??? तो चालक म्हणजे एक भयानक प्रकार होता. आख्ख्या रस्त्यात एक शब्दाने देखील बोलला नाही. त्याचा अवतारदेखील एकदम भयानक होता. दाढी वाढलेली. अंधारातसुद्धा त्याचे डोळे लाल पानावाल्यासारखे दिसत होते.. ओठ काळपट लाल होता.. गळ्याभोवती एक काळा मफलर गुंडाळलेला, आणि तसाच मफलर डोक्याभोवती देखील बांधलेला.. थंडी असूनदेखील शर्ट ची वरील २ बटणे उघडीच!!! असो, त्याने गाडी थांबवाल्यानंतर लगेच घाईतच गाडीतून खाली उतरला. आणि आम्हाला काहीच न बोलता फक्त मान हलवून ग्दीतून खाली उतरण्याचा इशारा केला. त्याचे हावभाव पाहून अगोदरपासुनच भित्रा असणारा सुश्या(सुशील) मात्र अजूनच घाबरत होता. त्याने तर हनुमाननामाचा जापच चालू केला होता. असो, ते ६ हि जण गाडीतून उतरून त्या चालकाला पैसे देऊन त्याला पुढील मार्ग कसा, आणि कुठून जातो ह्याची विचारणा करताच त्याने त्याचे तोंड उघडले.. प्रवासादरम्यान त्याने बोलण्याची हि पहिलीच वेळ होती.त्याने शब्द उच्चारताच मंग्याच्या अंगात थंडीच भरली.मंग्याला जणू कापरंच भरलं, त्याला त्या चालकाच्या आवाजातील भयानकता प्रकर्षाने जाणवली. त्याने चालकाचा आवाज ऐकताच दोन पावले मागे सरकण्याचा पवित्रा घेतला. त्या चालकाचा आवाज आता अतिशय घोगरा आणि मागच्यापेक्षा खूप वेगळा (भीतीदायक) भासत होता. सुश्या आणि मंग्या यांच्यात डोळ्यांतल्या डोळ्यांत काही इशारे झाले… त्या चालकाने त्यांना एका रेल्वे track कडे बोट दाखवले आणि