हा खेळ सावल्यांचा - भयकथा
मैडम आज उठायाचा विचार आहे की नाही… ” सुमित गळ्यात टॉय बांधत बोलु लागला तशी पुजा खडबडुन जागी झाली. ” अरे देवा… नऊ वाजले….???” ती गडबडीत उठली तसा सुमित म्हणाला… ” एे स्टुपिड…. घाई करु नको… मी चहा नाष्ता केलाय…दोघांसाठी…. काळजी करू नकोस… निघतो मी…लव्ह यु…” म्हणत सुमित ने पुजा च्या कपाळाचे चुंबन घेतले आणि निघुन गेला… पुजा बेडवर तशीच बसुन आपल्यावर जीव ओवाळुन टाकणा-या सुमित कडे पहात होती… पन त्यांच्या वागण्यात असा अचानक बदल का होतोय. पुजा फ्रेश होऊन आपल्या घरकामात गुंतली … नुकतीच कामावर ठेवलेली मोलकरीन आज आली नव्हती…. काम आवरून ती टीव्ही पहात सोफ्यावर बसली तोच मोबाइल ची रिंग झाली…. नंबर अनोळखीच नव्हता… “हैलो..” तीन फोन रिसीव्ह केला तस समोरची व्यक्ती बोलु लागली… ” मैडम कन्स्ट्रक्शन साईट वर सुमित साहेबांचा accident झालाय.. लवकर या..” त्याचे शब्द कानावर पडताच तीच्या चेह-यावरील रंग उडाला… खळ्ळ कन डोळ्यात पाणी तराळले.. मोबाइल हातात तसाच धरत ती धावत आपल्या रुम मधुन बाहेर पडली… पडत धडपडत ती मुख्य रस्त्यावर आली… ” अॉटो…” तीच्या ओरडण्यान रस्त्याच्या पलिकडे पैसेंजर ची वाट पहात थांबलेला अॉटो वाला वेगातच आला… ती अॉटो मधे बसली … तीला हुंदका आवरत नव्हता..मनात नकोनको ते विचार येत होते.. ‘ काय झाल असेल त्याला.. कसा असेल..खुप लागल असेल का….’ काही वेळातच अॉटो सांगीतलेल्या ठिकाणी पोहचली तशी ती लगबगीने खाली उतरली आणि धावत सुटली… आजुबाजुचे लोक आश्चर्यान पहात होते.. पन तीला कोणाशी काही घेणदेन नव्हत… काही अंतरावर एका नव्या ईमारतीच बांधकाम सुरू होत.. बांधकामासाठी लागणारी वाळु , खडी यांचा ढीग च्या ढीग तर बाजुला यु आकारात वाकवलाल्या लोखंडी सळ्यांचा खच पडलेला.. बांधकामाची जागा असल्यान सिमेंट, खडीची पांढरी धुळ हवेत पसरलेली.. समोरच थोड्या मेकळ्या जागेत तीला काही लोक जमलेले दिसले तसा तीचा धीर सुटला… पावल जमिनीत रूतल्यासारखी जड झाली होती… तशीच चालत ती त्या गर्दीच्या दिशेने निघाली… तीला आपल आयुष्यच संपल्यासारख झाल होत… गर्दी तुन वाट काढत पुढ गेली तशी ती मट्टकन खालीच बसली… समोर एक टेबल होता आणी त्यावर बिल्डींगच्या डिझाईन ची ड्रॉईंग पसरलेली आणि टेबल समोरील खुर्चीवर बसलेला सुमित आपल्या सहका-यांना सुचना देत होता… पुजाला अस समोर पाहुन तो चकीत झाला… सुमित ला पाहुन पुजा हुंदके देत रडु लागली.. तीला काहीच सुचत नव्हत… सुमितन आपल्या सहका-यांना कामाला लावल आणि पुजा ला शांत करत आत आपल्या केबीन मधे घेऊन गेला.. पुजा अजुन ही रडतच होती… “सुमित मी वेडी नाही रे… खरच मला अस का होतय , कोण हे करतय, सारखी एक सावली आपल्या घरात वावरताना दिसते.. मला तुझी खुप काळजी वाटते रे…” ” अग वेडे….कुणितरी मस्करी केली असेल..” सुमित पुजाला समजवत केबीन मधुन बाहेर पडला… ” तुझ प्रेम आहे ना माझ्या सोबत.. मला काही नाही होणार… ” तोच कोणीतरी ओरडल आणि कानाचे पडदे फाटावेत अशा भिषण , कर्कश्य आवाजाने सर्वच हादरून गेले… सुमित भीतीने थरारला तर पुजा च्या तोंडातुन आर्त किंकाळी बाहेर पडली… काही वेळापुर्वी सुमित ज्या खुर्चीवर बसुन सहका-यांना आदेश देत होता त्यावर बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन कोसळली होती टेबल खुर्चीचा चक्काचुर झाला पुजा अजुनही भीतीन थरथर कापत होती. तोच गर्दीतुन कोणीतरी बोलल.. ” सुमित साहेब… तुम्ही रोज या खुर्चीवर बसुन पहानी करता.. आज मैडम आल्या म्हणुन तुम्ही वाचलात….” काही वेळात सगळ नॉर्मल झाल. सुमित पुजा ला सोडायला घरी आला आता मात्र तो ही अस्वस्थ झाला… त्या दिवसा पासुनच सुमित ला शारीरीक त्रास होऊ लागला.. डोक्यात प्रहार व्हावा अस दुखू लागल… दुस-या दिवशी डॉक्टरांना दाखवल.. काही टेस्ट केल्या औषध दिली… या घटनेला दोनच दिवस झालेले दिवस झाले… सुमित डॉक्टरांना भेटुन घरी येत होता.. तसा पाऊस बराच होता म्हणजे काही वेळापुर्वी धो धो पाऊस पडेल अस वातावरण झाल होत पन मघापासुन सुटलेल्या वा-याने सार चित्रच बदलुन टाकलय… आता फक्त अधुनमधुन बारीक पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि वारा ही बेताचाच होता… गाडीच्या काचेवर पडणारे पाणि व्हायपर बाजुला करत होता आणि त्या रिकाम्या काचेवर नवे थेंब बरसत होते.. जसा पाठशीवनीचा खेळ सुरू होता. आपल्या भविष्याच्या विचारात गुंतलेल्या सुमीत ची नजर डैशबोर्ड वर ठेवलेल्या कागदी लिफाप्यावर गेल तस काही वेळापुर्वी डॉक्टर देसाईं सोबत झालेली चर्चा आठवली. “आज खुपच वैताग आलाय…डोक अगदी फुटुन चिंधड्या होतात की काय अस वाटतय… पन खर सांगायच तर आता हे माझ्या सहनशक्ति पलिकडे झालय…..” दोन्ही हातानी डोक गच्च धरत सुमित बोलत होता आणि समोर डॉक्टर मात्र त्याच बोलण शांतपणे ऐकत होते… सुमित समोर त्याचे रिपोर्ट्स धरत ते म्हणले. ” सुमित… हे तुझे एम़आरआय रिपोर्ट्स ,सिटी स्कैन रिपोर्ट्स”…अस म्हणत एक एक रिपोर्ट्स