Over Maratha Tarun - मराठा तरुण
साप्ताहिक - मराठा तरुणMaratha Tarun - मराठा समाजातील एकमेव साप्ताहिक
माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना, मराठा मित्रांना व हितचिंतकांना.. जय मराठा!!
सन २०१० पासून मराठा तरुणांचा शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रगतीसाठी मी यशस्वी-अयशस्वी ठरलो. समाजकार्याची ही प्रक्रिया अविरत, अखंड चालणारी आहे. माझ्यासारख्या एका मराठा व्यक्तीकडून सुरुवात होऊ शकते, प्रक्रिया होऊ शकते पण ती प्रक्रिया कायम चालत राहण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांवर आहे.
मराठा समाजाने अराजकीय भूमिका घेत कुठल्याही राजकीय पक्ष, संघटना अगोदर प्रथम "मराठा जातीचा" असण्याला प्राथमिकता द्यायला हवी हा विचार मी आधीपासूनच मांडत आलो आहे. यापुढे सुद्धा हाच विचार पुढे नेण्याचा दृष्टिकोन आहे.
"मराठा" जात नावासमोर लागली किंवा "जय भवानी, जय शिवाजी" म्हंटल की जबाबदारी संपत नाही; जबाबदारी सुरू होते!
साप्ताहिक - मराठा तरुण च्या माध्यमातून काही औषधी विचारांचा डोस देण्याचं काम वेळोवेळी होत राहील. तुम्हाला पचेल न पचेल पण हे औषध नक्कीच गुणकारी असेल याची खात्री देतो. फक्त ते पचवण्याची तयारी ठेवा.
या सप्ताहिकातून मराठा समाजाविषयाची माहिती, गडकिल्ल्यांची माहिती, मराठा समाजबाबतीतील वर्तमान घडामोडी, ऐतिहासिक माहिती, शिक्षण नोकरी आणि व्यवसाय संदर्भातील उपयुक्त माहिती देण्याचा प्रयास करणार आहे.
धन्यवाद!
जय मराठा!!!
-मराठा प्रविण.
अध्यक्ष - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)
संपादक - साप्ताहिक, मराठा तरुण
Maratha Tarun - मराठा तरुण :
सभासद होण्याचे फायदे:
१) साप्ताहिक अंकाचे शुल्क रु. ४ इतकं अत्यल्प आकारले आहे.
२) दर शनिवारी साप्ताहिक अंक या ऍप वर वाचता येईल.
३) सभासद झाल्यावर मागील सर्व अंक ऍप वर वाचता येतील.
४) मराठा तरुणांसाठी उपयुक्त माहिती दिली जाते.
५) मराठा समाजातील सर्व घडामोडींचा आढावा मिळतो.
साप्ताहिकाची वैशिष्ठ्ये:
१) मराठा समाजासातील पहिले व एकमेव डिजीटल साप्ताहिक
२) अवघ्या रुपयांत मराठा समाजाच्या सर्व बातम्या व माहिती
३) १ लाखाहून अधिक लोकांनी वाचेललं सुप्रसिद्ध साप्ताहिक
What's new in the latest 1.0.4
Maratha Tarun - मराठा तरुण APK -informatie
Oude versies van Maratha Tarun - मराठा तरुण
Maratha Tarun - मराठा तरुण 1.0.4
![APKPure-icoon](https://image.winudf.com/v2/upload/images/icon.png/image.png?fakeurl=1&w=120)
Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!