เยี่ยมชมเว็บไซต์ของเกษตรกร Agrowone สำหรับเกษตรกร - www.agrowone.com
#ॲग्रोवन केवळ परिश्रम करून शेती यशस्वी होणार नाही. हाताने परिश्रम करण्याबरोबरच डोक्याने सुद्धा हा व्यवसाय केला पाहिजे. आपण केवळ मजूर नाही. आपण उत्पादक, व्यावसायिक आहोत. त्याचबरोबर आपण निसर्गाची किमया साकार करणारे कलाकार सुद्धा आहोत. म्हणून शेतीमध्ये एक आध्यात्मिक आनंद दडलेला असतो. जो केवळ हाताने काम करतो तो मजूर असतो. जो हात आणि डोके वापरून काम करतो तो कारागीर असतो आणि जो हात, डोके वापरून आणि अंत:करण ओतून काम करतो तो खरा कलाकार असतो कलावंत असतो. शेतकरी हा कलावंत असतो. तेव्हा शेती व्यवसायाशी असलेले निसर्गाचे नाते लक्षात घेऊन कलावंत होऊन शेती केली पाहिजे शेतीचे महत्व कधीच कमी होणार नाही आणि शेतीला चांगले भवितव्य आहे, असे समजले जाते याचे कारण हे आहे निसर्गाने प्रत्येक बियांमध्ये ठेवलेली विशिष्ट पुनरुत्पादन शक्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत माणसाला आणि प्राण्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय जगता येत नाही तोपर्यंत शेतीचे महत्व टिकून राहणार आहे आणि या दोन गोष्टी शाश्वत आहेत. म्हणूनच शेती व्यवसायाला शाश्वत उद्योग म्हटले जाते भारतातील सर्व शेतकरी आणि कृषिउद्योजकांच्या विकासात आम्हाला योगदान देता येत आहे याचा आम्हास अभिमान आहे.