เกี่ยวกับ Haripath Marathi/हरिपाठ संग्रह
हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय.
हरिपाठात हरिनाम महात्म्याचे सर्वांगीण प्रतिपादन असते. हरिपाठ याचा अर्थ हरिनाम पाठ असा आहे. नामस्मरण ही हरीची फार मोठी सेवा आहे. हरीला तर सर्व पूजा, पादसेवन,वंदन दास्ये, इत्यादी नवविधा भक्ती पैकी अतिप्रीय अशी नामस्मरणसेवा आहे.येथे नामधारक हाच खरा हरिदास होय. दास्यत्व म्हणजे सेवा.
हरिदासाची हरिनामावर पूर्ण श्रध्दा असते. म्हणून तो सदैव मुखाने हरिनाम गात असतो. त्याच्या परिणामाने त्याची सर्व चिंता हरपून जाते. चिंता ही एक मानसिक विकृती आहे. तो एक अती दु:खद विकार आहे. जीव कोणत्याही चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत असला, तरी त्याला चिंता ही सोडीत नाही.
हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.
हरि म्हणजे जन्म-मरण हरण करुन परम-पद
प्राप्ती करुन देनारा सदगुरु.
सदगुरु ने दिलेला पाठ म्हणजे हरिपाठ
सदगुरु ने दिलेले नाम म्हणजे हरिपाठ
सदगुरु ने दिलेला मंत्र म्हणजे हरिपाठ
सदगुरु ने दिलेली आज्ञा म्हणजे हरिपाठ
सदगुरु ने दिलेला सदाचार म्हणजे हरिपाठ
सदगुरु ने दिलेले चिन्तन म्हणजे हरिपाठ
सदगुरु ने दिलेले सर्वस्व म्हणजे हरिपाठ
माऊली'नी ह्या हरीपाठात सदगुरु म्हणजे कोण, सदगुरु ची मानव जिवनात का व किती गरज आहे, व त्यंची कशी प्राप्ती करुन घ्यावी,
आणि हे मानव जिवन कसे सार्थक करुन घ्यवे
हे सरळ सोप्या भाषेतून वर्णन केले आहे.
या अँपमध्ये तुम्ही तुम्हाला आवडलेले अभंग मला आवडलेल्या विभागात सेव करून ठेवू शकता त्यासाठी तुम्ही अभंग वाचत असताना पिवळ्या स्टार वरती क्लीक करा व ते काढून टाकण्यासाठी लाल स्टार वरती क्लीक करा.
What's new in the latest 1.3
ข้อมูล Haripath Marathi/हरिपाठ संग्रह APK
Haripath Marathi/हरिपाठ संग्रह รุ่นเก่า
Haripath Marathi/हरिपाठ संग्रह 1.3
Haripath Marathi/हरिपाठ संग्रह 1.2

การดาวน์โหลดที่รวดเร็วและปลอดภัยเป็นพิเศษผ่านแอป APKPure
คลิกเพียงครั้งเดียวเพื่อติดตั้งไฟล์ XAPK/APK บน Android!