कांदा लागवड
4.2 and up
Android OS
कांदा लागवड hakkında
कांदा लागवड कशी व कधी करावी कांदा लागवडीचे तंत्रज्ञान लागवड माहिती व्यवस्थापन
कांदा लागवड कधी शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा.. कांदा हा संपूर्ण भारत देशात दररोज आहारात वापरला जातो त्यामुळेच कांद्याची मागणी ही वर्षभर मोठ्या प्रमाणात असते.
परंतु बर्याच वेळा मागणी आणि पुरवठ्या मध्ये झालेल्या तफावतीमुळे कांद्याचे भाव हे बाजारात अस्थिर असतात. महाराष्ट्र राज्य हे भारतात कांदा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे परंतु हवामानातील अनपेक्षित बदल आणि शेतकर्यांकडे कांदा साठवणीची नसलेली सोय ह्यामुळे बर्याच वेळा आमचे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात. ह्या लेखामद्धे आपण कांदा लागवड व कांद्यावरील रोग व किडींचे नियंत्रण हयाबद्दल माहिती घेणार आहोत.
लागवडीसाठीचे हवामान व लागवड हंगाम
रब्बी हंगामात कांद्याची लागवड करणे हे जास्त फायद्याचे ठरते. कांदा लावल्यापासून काही दिवस कांद्याला थंड हवामान हवे असते तर त्यानंतर कांद्याची वाढ होताना हवामानातील तापमान हे थोडे जास्त असेल तर कांद्याच्या कंद वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या आस-पास कांदा लागवड केली तर त्यावेळच्या थंडीचा उपयोग होतो आणि जानेवारी महिन्यातील स्वछ सूर्यप्रकाशामुळे कांदा चांगला पोसला जातो.
त्याचसोबत महाराष्ट्रामद्धे खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात देखील कांदा लागवड केली जाते. खरीप हंगामात लागवड करताना जुन-जुलै महिन्यात करावी तर उन्हाळी हंगामात कांदा लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी.
जमीन व पूर्वमशागत
कांदा लागवडीसाठी मध्यम ते कसदार जमीन उपयुक्त ठरते. ही जमीन पाण्याचा निचरा करणारी व भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये सेंद्रिय घटक चांगल्या प्रमाणात असावेत ज्यामुळे कांदा पिकाची उत्तम वाढ होते.
लागवडीसाठी जमीन तयार करताना जमीनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळया देऊन ढेकळे फोडून घ्यावीत आणि जमिन भूसभुशित करावी. जमिनीत एकरी १५ टन शेणखत टाकावे त्यामुळे कांद्याला आवश्यक असलेले सेंद्रिय घटक जमिनीत उपलब्ध होतात.
कोणते वाण वापरावेत व किती बियाणे लागेल?
बसवंत ७८० : खरीप व रब्बी हंगामासाठी ही जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
एन – ५३ : ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.
एन- 2-4-१ : ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्यम गोल असून साठवणूकींत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल मिळते.
पुसा रेड : कांदे मध्यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
लागवडीसाठी एकरी कांद्याचे ४ ते ४.५ किलो बियाणे आवश्यक असते.
लागवड कशी कराल?
कांदा लागवड ही वाफा पद्धतीने किंव्हा सरी पद्धतीने करू शकतो. पण त्याआधी कांद्याची रोपे तयार करणे महत्वाचे आहे. गादी वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे तयार करावीत. जेथे गादी वाफे तयार करायचे आहेत ती जमीन व्यवस्थित नांगरून व कुळवून घ्यावी व मग तिथे १ मी रूंद ३ मी लांब १५ सेमी उंच वाफे बनवावेत. ह्या वाफयाच्या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे व बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.
रोपांना हरबर्याच्या आकाराची गाठ तयार झाली की ते लागवडीसाठी तयार आहेत असे समजावे. खरीप हंगामातील कांदयाची रोपे ही 6 ते 7 आठवडयांनी तर रब्बी हंगामात लागवड केलेली रोपे ही 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्या आधी २४ तास गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे.
त्यानंतर रोपे काढून ती वाफा पद्धतीने किंव्हा सरी पद्धतीने लावावीत. सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. रोपांची लागवड १२.५ बाय ७.५ सेमी अंतरावर करावी. सपाट वाफयामध्ये हेक्टरी रोपांचे प्रमाण जास्त असले तरी मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्पादन मिळते.
खते व पाणी व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे. त्यानंतर 1 महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे
What's new in the latest 1.0
कांदा लागवड APK Bilgileri
APK Uygulaması ile Süper Hızlı ve Güvenli İndirme
XAPK/APK dosyalarını Android'e yüklemek için tek tıkla!