संत तुकाराम चरित्र hakkında
या ऍप मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जीवन चरित्र वाचायला मिळेल.
या ऍप मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जीवन चरित्र वाचायला मिळेल.
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु' म्हणून ओळखतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.
‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्याच्या अभंगाचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
What's new in the latest 1.3
* haripath added
संत तुकाराम चरित्र APK Bilgileri
संत तुकाराम चरित्र'in eski sürümleri
संत तुकाराम चरित्र 1.3
संत तुकाराम चरित्र 1.2
संत तुकाराम चरित्र Alternatif
APK Uygulaması ile Süper Hızlı ve Güvenli İndirme
XAPK/APK dosyalarını Android'e yüklemek için tek tıkla!