關於Time Management(वेळ व्यवस्थापन)
वेळव्यवस्थापन“時間管理”हातसासोपाविषयआहे.पणकठीणआहेतेअमलातआणणं
तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का, की काही लोकांकडे खुप काम करुनही वेळ शिल्लक राहतो, आणि काही लोकांना वेळ पुरतच नाही...त्यांची सतत धावपळ चालू असते ?
पहिल्या कॅटेगरी मधील लोकांकडे कामं कमी असतात असं नाही...पण त्यांना वेळेचं महत्त्व कळलं आहे आणि वेळेचं योग्य नियोजन कसं करायचं हे ते शिकले आहेत.
Time management किंवा वेळ व्यवस्थापन हा तसा सोपा विषय आहे. पण कठीण आहे ते अमलात आणणं. त्यासाठी "Time management" चे तंत्र शिकून ते शिस्तपुर्वक अमलात आणले पाहिजे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानंतर कोणते काम , कधी करायचे याचे नियोजन केले पाहिजे.
Time management च्या प्रसिद्ध अशी अनेक तंत्र आहेत. ती तुम्हाला या कोर्समध्ये शिकता येतील. ही तंत्र नीट आत्मसात करुन प्रत्यक्षात त्यांचा वापर सुरु केलात तर तुम्ही कमीत कमी ३०% वेळ वाचवू शकता.
आणि हा वाचवलेला वेळ तुमच्या कुटुंबाकरीता, धंद जोपासण्यासाठी, नविन काही शिकण्यासाठी वापरु शकता.
देवाने प्रत्येकाला वेगळं रंगरुप दिले आहे, कोणी श्रीमंत घरात जन्माला येतो तर कोणी गरीब घरात जन्म घेतो. कोणी जन्मतःच हुशार असतो तर कुणाला मेहनतीने हुशार व्हावं लागतं. पण एक गोष्ट देवाने सगळ्यांना समान दिली आहे. ती म्हणजे दिवसातील २४ तास. हे देवाने दिलेले २४ तास आपण कसे वापरतो, त्यावरुन आपण आयुष्यात कीती प्रगती करु शकणार हे ठरत असतं.
म्हणूनच मित्रांनो, "वेळ" हा आपल्याकडे असलेला सगळ्यात मोठा आणि महाग स्त्रोत आहे. एकदा वाया घालवलेला वेळ कधीच परत येणार नाही आणि जास्तीचा वेळ कधी साठवून ठेवता येणार नाही. तर हा अमुल्य "वेळ" योग्यप्रकारे कसा वापरायचा ? Time manage कसा करायचा हे आपण या कोर्स मध्ये शिकणार आहोत.
आपल्याला खुप काही शिकायचंय ! तेव्हा लवकर हा कोर्स जॉइन करा....भेटुया या कोर्समध्ये......ऑनलाइन !