Sobre este SARTHI PUNE
Instituto de Pesquisa, Treinamento e Desenvolvimento Humano Chhatrapati Shahu Maharaj
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक 25 जून, 2018 रोजी कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये स्थापन करण्यात आलेली नॉन-प्रॉफिट कंपनी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाची सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण घेऊन कृती संशोधनाकरीता मूल्यमापन करणे व कार्यक्रमांच्या अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांचा विचार करता लक्षित गटाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी संशोधन करून माहितीचे संकलन व पृथ्थकरण करणारी “शिखर संस्था” म्हणून सारथी संस्था कार्यरत आहे .लक्षित गटाच्या समाजातील विविध समस्यावर जाणीव जागृती करून विशेष व पथदर्शी प्रकल्प वेळोवेळी हाती घेण्यात येत आहेत. सद्यस्थितीत लक्षित गटातील इच्छुक विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत पोलीस भरती करता निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले निशुल. त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज marcaष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती अंतर्गत एम.फील व पीएच.डी. करणाऱ्या विद्याथ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे .छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 5000 प्रतींची छपाई बालभारती या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.लक्षित गटातील इच्छुक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने परिक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देण्यात येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 2020 करिता लक्षित गटातील 59 विद्यार्थ्यांची झूम मीटिंग च्या माध्यमातून मुलाखत तयारी व अभिरूप मुलाखती घेण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षेसाठी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना "निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.
Novidades em 2.2 mais recente
Informações sobre SARTHI PUNE APK
Versões Antigas de SARTHI PUNE
SARTHI PUNE 2.2

Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App
Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!