Tujhyashich Boltyey Me Marathi
Sobre este Tujhyashich Boltyey Me Marathi
Tujhyashich Boltyey Me é uma autobiografia de SHambhavi Hardikar
Tujhyashich Boltyey Me é uma autobiografia de SHambhavi Hardikar.
'तुझ्याशीच बोलत्येय मी' हे शांभवी हर्डीकर यांचे आत्मकथन. ३०-३५ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि शांभवी यांचे पती श्री. जयराम हर्डीकर यांचे अपघाती निधन झाले. प्रेमाचा डाव नुकताच कुठे रंगायला लागला होता. दोन गोजिरवाण्या मुलींनी जयराम आणि शांभवी यांचे कुटुंब साकारले होते. एकसंध असे हे कुटुंब एका क्षणात विसकटून गेले. शांभवीला खरेच वाटेना की, आपला निरोप घेऊन गेलेले जयराम आता परत कधीच परतणार नाहीत. तिच्यासाठी काळ जणूकाही त्याच क्षणात गोठून गेला.
त्यानंतर उरले ते फक्त यंत्रवत जिणे आणि जयरामच्या आठवणी काढून स्वतःला सावरणे. सोनी-मोनीसारख्या दोन गोड मुलींची जबाबदारी असल्याने शांभवीने स्वतःला सावरले. पुन्हा संसार उभा करायचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, 'बाईचे पहिले प्रेम कधीच संपत नाही.' शांभवी सगळे सोपस्कार पूर्ण करीत, आपली कर्तव्ये पाळीत जगत राहिली. पण प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता जयराम.
सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात, वंचनेच्या प्रसंगात आणि अखंड सोबत करणाऱ्या एकटेपणात जयराम तिच्याशी बोलत होता. तिला साथ करीत होता. हेच सगळे शब्दरूपाने शांभवीने आपल्या पुस्तकात उतरविले आहे.
पुस्तक लिहिण्याची पद्धत डायरी लिहिल्यासारखी आहे. त्यामुळे घडलेले प्रसंग शांभवीने जसेच्या तसे आपल्या लेखणीतून उतरविले आहेत. प्रत्येक प्रसंग जिवंत असल्याचे जाणवते व वाचक हा त्याचा साक्षीदार असल्याचे भासते.
काही वेळेला जगण्यासाठीसुद्धा संभ्रम निर्माण करावा लागतो. वास्तव इतके दाहक असते की काही माणसे त्याला सामोरे जाऊ शकत नाहीत अथवा त्याच्याशी सामनाही करू शकत नाहीत. अशा वेळेला एका विशिष्ट काळवेळेत गोठून गेलेल्या मनाला असा संभ्रम निर्माण करायला फार आवडते. कारण या संभ्रमामुळेच जगणे सुसह्य होते. शांभवी हर्डीकर हिने जयराम गेल्यानंतरचा तो दीर्घ कालखंड असाच एका गोठलेल्या स्थितीत व्यतीत केला आहे. तो कुठेतरी आपल्यालाही हेलावून टाकतो. शेवटी पुनर्मीलनाची आशा आणि नातवांमध्ये जयरामला पाहणे हासुद्धा या संभ्रमाचाच भाग आहे. दारू पिण्यापेक्षा, वाईट व्यसने लावून घेण्यापेक्षा कित्येकदा असे वाटते की असे संभ्रमच छान असतात. ते त्या माणसाला जगण्याचे बळ देतातच; पण त्याचे करपलेले आयुष्य सुखावहही करतात. शांभवीच्या दोन्ही मुली समिंदरा आणि संज्योत यांनी ज्या पद्धतीने आईला सांभाळले आहे ते ते वाखाणण्यासारखे आहे. आता शांभवीची नातवंडेही तिला प्रेमाची ऊब देत आहेत. शांभवीच्या या आत्मकथनाला माझ्या मनापासून शुभेच्छा!
- नीला सत्यनारायण
Novidades em 1.0 mais recente
Informações sobre Tujhyashich Boltyey Me Marathi APK
Versões Antigas de Tujhyashich Boltyey Me Marathi
Tujhyashich Boltyey Me Marathi 1.0
Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App
Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!