关于केळी लागवड #Agrownet™
如何以及何时种植香蕉 ्रोGrovan 香蕉种植技术 # Agrowone®
केळीसाठी भुसभुशीत पाण्याचा निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीची, पोयटायुक्त, भरपूर सेंद्रिय कर्ब असलेली 6 ते 7.5 सामू असलेली जमीन योग्य आहे. क्षारयुक्त, चोपण जमिनीमध्ये केळीची लागवड करू नये.
केळीचे वाण
बसराई, अर्धापुरी, ग्रॅंड नाइन, श्रीमंती. यापैकी अर्धापुरी, तसेच ग्रॅंड नाइन वाणाची लागवड मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात अधिक होते. ग्रॅंड नाइन वाणाची लागवड अन्य भागामध्ये अधिक आढळते.
लागवडीचे अंतर
केळी लागवडीचे अंतर केळीच्या वाणानुसार ठरवावे लागते.
बसराई व अर्धापुरी या वाणांसाठी केळीची लागवड 5 फूट x 5 फूट अंतरावर करावी.
ग्रॅंड नाइन या वाणासाठी केळीची लागवड 6 फूट x 5 फूट अंतरावर करावी. जास्तीचे अंतर शक्यतो पूर्व- पश्चिम ठेवावे.
लागवड पद्धती
केळी लागवड साधारणतः कंद किंवा उतिसवंर्धित रोपांपासून केली जाते.
कंदापासून लागवड
कंद निरोगी, जोमदार व घेरदार बुंध्याच्या, घडावर 9 ते 10 फण्या असलेल्या मातृवृक्षापासून निवडावा.
तलवारीच्या पात्यासारखी सरळ मध्यम आकाराची पाने असलेले आणि 500 ते 750 ग्रॅम वजन असलेले शंकू आकाराचे कंद लागवडीसाठी निवडावेत.
लागवडीपूर्व कंद प्रक्रिया
केळी लागवड करताना कंदांवरील मुळे किंवा अनावश्यक भाग छाटून काढावा. कंद पाण्याने स्वच्छ धुवावेत. कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम आणि --------कीटकनाशक बदलून घेणे---------- मोनोक्रोटोफॉस ---------15 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात कंद किमान अर्धा तास बुडवून ठेवावेत. त्यानंतर कंदाची लागवड करावी.
उतिसंवर्धित रोपांची लागवड
रोपे लागवडीच्या आदल्या दिवशी ठिबक सिंचन संच चालवून जमीन ओली करून घ्यावी. वाफसा स्थिती आल्यावर लागवड करावी.
रोपांची लागवड पावसाळ्यामध्ये दिवसभर करता येते. मात्र अन्य हंगामात लागवड करताना दुपारी तीन वाजेपर्यंतच करावी.
रोपे चार ते पाच पानांची, पूर्णपणे तीन महिने हार्डनिंग झालेली सशक्त रोपे लागवडीसाठी वापरावीत.
सर्व प्रथम रोपांची पिशवी हातामध्ये घेऊन त्यातील माती हाताने दाबावी- जेणेकरून रूटबॉल फुटणार नाही. त्यानंतर डाव्या हाताच्या साह्याने रोप मातीसह अलगद काढून घ्यावे.
मातीच्या गोळ्यासह रोपे 1 x 1 x 1 फूट आकाराच्या खड्ड्यामध्ये अथवा सरीमध्ये ठेवावे. सोबत 10 ग्रॅम फोरेट प्रति झाड जमिनीत मिसळावे.
लागवड करताना रोपाच्या सभोवती थोडे शेणखत, कंपोस्ट खत व मातीची भर लावावी. मुळाच्या कक्षेत गरजेपेक्षा जास्त पोकळी राहणार नाही, अशा पद्धतीने माती दाबावी.
त्वरित ठिबक संच चालवून पाणी द्यावे. जमीन कायम वाफसा स्थितीमध्ये ठेवावी.
रोपे लागवडीनंतर इर्विनिया रॉट या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. लागवडीनंतर एक आठवड्याने 200 लिटर पाण्यात कॉपर ऑक्सिक्लोराइड 600 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन स्टार द्यावा 3 ग्रॅम आणि क्लोरपायरीसफॉस 600 मिलि मिसळून द्रावण तयार करावे. यातील 100 मिलि द्रावणाची प्रति झाड याप्रमाणे आळवणी करावी.