关于Gram Panchayat App Tavashi
बनवाआपलीग्रामपंचायतडिजिटलआणिआजचव्हाडिजिटलइंडियाच्यामोहिमेतसामील。
तावशी ग्रामपंचायत अँपमधून तुम्ही सर्व ग्रामपंचायत व गावाविषयी माहिती मिळवू शकता. गावविषयी माहिती, लोकसंख्या, गावात कसे पोहोचाल, गावातील वाड्या, ऐकून क्षेत्रफळ, कृषीविषयक माहिती, प्राथमिक शाळा व अंगणवाडी हि सर्व माहिती तुम्हाला या अँपद्वारे ऑनलाईन तसेच ऑफलाईन मिळून जाईल.
अँपमध्ये गावातील ग्राम पंचायत सदस्यांची माहिती व एका क्लिक वर कॉल करण्याची सुविधा.
ग्राम पंचायतीने केलेल्या विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे फोटोस अल्बमद्वारे ग्रामस्थांसाठी प्रदर्शित.
मतदार यादी, दारिद्र्य रेषेची यादी इत्यादी प्रकारच्या याद्या अँपद्वारे ग्रामस्थांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जन्म नोंद दाखला, मृत्त्यू नोंद दाखला, रहिवासी दाखला, सौचालय दाखला व इतर सर्व प्रकारचे दाखले, त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा या अँपद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे.
शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजना जसे कि पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर सर्व योजना व त्याच्याशी संबंधित वेबसाइट अँपमधून एका क्लिकवर उपलब्ध.
गावातील ग्राम पंचायत द्वारे केली गेलेली पूर्ण व चालू विकास कामे, त्यावरील खर्च, त्याविषयी माहिती व फोटोस चालू घडामोडी पर्यायामध्ये दर्शविण्यात आली आहेत.
ग्राम पंचायती द्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा(पाणीपुरवठा, दिवाबत्ती, गटार लाईन, स्वच्छता, रस्ते/दळणवळण, वृक्षारोपण, शैक्षणिक सुविधा), त्याबद्दल माहिती व काही समस्या आल्यास त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा या अँपद्वारे पुरविण्यात आली आहे.
महत्वाचे संपर्क(महिला हेल्पलाईन, कृषी सहाय्यक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस स्टेशन, ऍम्ब्युलन्स) व एका क्लिक वर कॉल करण्याची सुविधा.
तालुक्याचा दैनिक हवामानाचा अंदाज ग्रामस्थांना अँपमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
最新版本6.0的更新日志
Gramsevak can send the notification announcement and people can view that notification on the app.