Acerca del तूर लागवड #Agrownet™
Cómo y cuándo plantar tur ॲTecnología de cultivo Grovan Tur # Agrowone®
तूर लागवड
तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणीसाठी आय.सी.पी.एल- 87 (120 दिवस), ए.के.टी.- 8811 (140 दिवस), बी.एस.एम.आर.- 853 (160 दिवस), बी.एस.एम.आर.- 736 (170 दिवस), विपुला (145- 160 दिवस) हे वाण निवडावेत. आंतरपीक पद्धतीने लागवड करताना तूर अधिक बाजरी (1-2), तूर अधिक सूर्यफूल (1-2), तूर अधिक सोयाबीन (1-3), तूर अधिक ज्वारी (1-2 किंवा 1-4), तूर अधिक कापूस (1-6 किंवा 1-8), तूर अधिक भुईमूग (1-3), तूर अधिक मूग (1-3), तूर अधिक उडीद (1-2) या पद्धतीने लागवड करावी.
सलग पीक घ्यावयाचे असल्यास आय.सी.पी.एल- 87 या अति लवकर तयार होणाऱ्या वाणाकरिता 45 बाय 10 सें.मी. अंतर ठेवावे. ए.के.टी.- 8811 वाणासाठी 45 बाय 20 सें.मी. अंतर ठेवावे. लवकर वाढणाऱ्या वाणाकरिता 60 बाय 20 सें.मी. अंतर ठेवावे. विपुला या मध्यम कालावधीच्या वाणाकरिता 90 बाय 20 सें.मी. अंतर ठेवावे.
सुधारित वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. प्रति हेक्टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजे 125 किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे.
Novedades más recientes 2.0
Información de तूर लागवड #Agrownet™ APK
![APKPure icono](https://image.winudf.com/v2/upload/images/icon.png/image.png?fakeurl=1&w=120)
Descarga rápida y segura a través de APKPure App
¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!