Tentang फणस लागवड #Agrownet™
Bagaimana dan kapan menanam belalang Teknologi penanaman belalang Grovan # Agrowone®
फणस लागवड -
♥हवामान जमीन -
नोव्हेंबर ते जानेवारी हा फणसाचा फुले येण्याचा हंगाम असतो.
फळांचा हंगाम जून महिन्यापर्यंत चालतो.
फळ संयुक्त असते, म्हणजे अनेक छोट्या फळांचा (ग-याचा) समूह असतो.
या वृक्षाला थंड हवामान आणि तीव्र उन्हाळा सोसत नाही, पण उष्ण-दमट हवामान आणि मध्यम पाऊस असणा-या भागात त्याची चांगली वाढ होऊ शकते.
लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर करता येते, पण खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणा-या जमिनीत वाढ चांगली होते.
काळ्या चिकण मातीत फळे उशिरा आणि कमी धरतात.
समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये हा वृक्ष वाढू शकतो. पण १२०० मीटर उंचीवरच्या भागातील फळे कमी दर्जाची असतात.
♥प्रमुख प्रकार -
फळांचे कापा आणि बरका (रसाळ) हे दोन मुख्य प्रकार पडतात.
गरे कापता येण्याजोगे असल्याने कापा म्हणतात.
कापा गरे मधुर स्वादाचे, खुसखुशीत असतात त्यामुळे बाजारात विक्री करण्यायोग्य असतात.
टिकवणक्षमताही रसाळ गऱ्यांपेक्षा चांगली असते.
रसाळ फणसाचे गरे कापता येत नाहीत.
नावाप्रमाणेच ते रसाळ, तंतुमय आणि उग्र स्वादाचे असतात.
त्यामुळे फणसपोळी करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.
हे गरे पिकल्यानंतर फार काळ टिकत नाहीत.
फळांचे आकारमान, चव, गंध, सालीचा प्रकार, काटे आणि त्याचा दाटपणा यावरूनही फणसाचे प्रकार पडतात.
तमिळनाडूमध्ये रुद्राक्षी नावाची लहान फळे असणारी आणि कमी काट्याची जात आढळते. श्रीलंकेत मध्यम दर्जाची फळे असणारी आणि गैरहंगामी फळे धरणारी जात आढळते.
रान फणस, बाधर आणि विलायती फणस या फणसाच्या कुळातीलच वनस्पती आहेत.
कमी-अधिक प्रमाणात त्यांचेही गुणधर्म फणसासारखेच आहेत.
विलायती किंवा नीर फणस किंवा बटाटा फणसाची लागवडही आपल्याकडे काही प्रमाणात होते.
त्याच्या पिठाची भाकरीही केली जात असल्याने त्याला "ब्रेड फ्रूट' म्हणतात.
♥लागवड तंत्रज्ञान -
फणसाच्या रोपांची निर्मिती बियांपासून होते.
बियांना "आठळ्या' म्हणतात.
कलमे गुटी पद्धतीने बांधता येतात.
त्याचप्रमाणे आंब्याच्या कोयीपासून (बाठ) जसे बाठे कलम बांधले जाते, त्याप्रमाणे फणसाच्या आठळ्यांपासून तयार होणाऱ्या कोवळ्या रोपांवरही कलमे बांधता येतात. त्याला "इपिकोटाइल ग्राफ्टिंग' असे म्हटले जाते.
कोकणात फणसाची कलमे जगण्याचे प्रमाण ५० ते ९० टक्के एवढे आहे.
एप्रिल आणि मे महिना कलमे बांधण्यासाठी उत्तम हंगाम आहे.
दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फणसाची लागवड आठ ते दहा मीटर अंतरावर पावसाळी हंगामामध्ये करावी.
चांगल्या जातीच्या कापा फणसाची जात निवडावी.
पाचव्या वर्षापासून प्रत्येक झाडास एक किलो युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
पहिली पाच वर्षे वयानुसार वरील खतांची मात्रा द्यावी.
माती परीक्षणाच्या अहवालानुसार खते द्यावीत.
रोपे सात-आठ वर्षांनी धरू लागतात, तर कलमांचा "धर' तिस-या वर्षापासून सुरू होतो. सर्वसाधारणपणे पूर्ण वाढलेल्या १५ वर्षांच्या फणसाच्या झाडापासून दर वर्षी सुमारे ३० ते ५० किंवा जास्तीत जास्त २५० फळे मिळू शकतात, त्यामुळे हेक्टरी ४० ते ५० टन उत्पादन मिळू शकते.
फणसावर रोग आणि किडींचा तसा फारसा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही.
काही ठिकाणी खोड कूज आणि आसामात फळ कूज रोग आढळतो.
काही ठिकाणी खोडकिडा आणि पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव आढळला आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली जात - कोकण प्रॉलिफिक
कोकणात लागवडीसाठी उपयुक्त
दहाव्या वर्षी प्रति झाड ७२ ते ७५ फणस
मध्यम आकाराची पाच ते सात किलो वजनाची फळे
जाड, पिवळसर पांढरट रंगाचे, खुसखुशीत, गोड स्वादाचे गरे
पाऊस पडल्यावरही गरे चांगले राहतात.
What's new in the latest 1.0
Informasi APK फणस लागवड #Agrownet™
![ikon APKPure](https://image.winudf.com/v2/upload/images/icon.png/image.png?fakeurl=1&w=120)
Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!