ढोबळी मिरची लागवड #Agrownet™
4.2
Android OS
このढोबळी मिरची लागवड #Agrownet™について
チリペッパーをいつどのように栽培するか्रो成長するチリ栽培技術#Agrowone®
ढोबळी मिरची लागवड हरितगृहात सिमला मिरचीची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड करून भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे कशी घ्यावीत यासंबंधी सखोल माहितीचा समावेश या लेखात केला आहे. सिमला मिरची ही बेल पेपर (इशश्रश्र झशशिी) स्वीट पेपर किंवा पेपर या नावाने युनायटेड किंगडम, कॅनडा आणि आयर्लंडमध्ये, तर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्यूझीलंडमध्ये ‘कॅपसिकम’ म्हणून ओळखली जाते. मिरचीच्या ज्या अनेक स्पिसीज आहेत त्यामध्ये सिमला मिरची ही ‘कॅपसिकम अॅनम’ या स्पिसीजमध्ये ओळखली जाते. या ‘कॅपसिकम अॅनम’ स्पिसीजमध्ये असलेल्या जातीपासून फळे निरनिराळ्या उदा. लाल, पिवळी, ऑरेंज, चॉकलेट ब्राउन, व्हॅनिला-व्हाइट आणि जांभळ्या रंगाची मिळतात. सिमला मिरचीचे उगमस्थान शास्त्रज्ञांच्या मते मेक्सिको, सेंट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असून त्यानंतर या जातीचे बियाणे 1493मध्ये स्पेनमध्ये यानंतर युरोपियन, आफ्रिकन आणि आशियन देशातील भागात पसरले गेले. आज चायना हे जगातील सर्वांत जास्त उत्पादन करणारा देश असून त्या खालोखाल मेक्सिको आणि इंडोनेशिया हे भाग आहेत. सिमला मिरची अमेरिका, युरोपमार्गे भारतात आली. भारतात मुख्यत: हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत सिमला मिरचीची लागवड होत आहे. सिमला मिरची पक्व असली तरी प्रथम फळांचा रंग हिरवा असून, नंतर जातीपरत्वे फळांचा रंग बदलतो. सिमला या रंगीत फळांचा मुख्य उपयोग सॅलड तयार करण्यासाठी होतो आणि हिरव्या रंगाच्या फळांचा उपयोग भाजी तयार करण्यासाठीसुद्धा होतो. सिमला मिरची ही एक उपयुक्त भाजी असून, ती चवीला तिखट नसते. या प्रकारात चव, फळांचा आकार, रंग, वजन आणि फळांच्या बाहेरच्या सालीच्या जाडीमध्ये भरपूर प्रकार आढळतात. चवीमधील फरक हा मुख्यत्वे फळामधील ‘कॅपसिसीन (उरिीळलळलळप) च्या प्रमाणावर अवलंबून असतो. ते साधारणत: 0.2 ते 4 टक्क्यांपर्यंत असते. फळांचा रंग अपक्व अवस्थेत जातीपरत्वे हिरवा, लाल किंवा पिवळा असतो.
आहारात सिमला मिरचीचे सेवन केल्यास होणारे फायदे
वर दर्शवल्याप्रमाणे सिमला मिरचीच्या फळांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजद्रव्ये उपलब्ध असल्याने हे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे जीवनसत्त्व ‘क’मोठ्या प्रमाणात असलेले आणि बिटाकॅरोटिन व लायकोपिन उपलब्ध असलेले शरीरात कॅन्सर होऊ नये म्हणून नियंत्रण करतात.
हवामान
हरितगृहामध्ये सिमला मिरचीची लागवड वर्षभर करता येते. तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित होत असल्याने भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे मिळतात. हरितगृहामध्ये बी उगवण्यापासून ते झाडांची वाढ, फुले व फळ धारणा होण्यासाठी तसेच फळांची वाढ होण्यासाठी प्रत्येक वेळी निरनिराळे तापमान सापेक्ष आर्द्रता नियंत्रत करावी लागते. बियाण्यांची समाधानकारक उगवण होण्यासाठी माध्यमातील तापमान 26अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. बियाण्यांची उगवण झाल्यावर रोपांची वाढ होण्यासाठी हरितगृहातील तापमान दिवसाचे तापमान 23 अंश सेल्सियस व रात्रीचे तापमान 20 अंश ते 21 अंश सेल्सियसपर्यंत नियंत्रित करावे. फळधारणा झाल्यावर रात्रीचे तापमान 17 अंश ते 20 अंश सेल्सियस व दिवसाचे तापम 21 अंश-24 अंश सेल्सियस नियंत्रित करावे. या तापमानात फळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. सिमला मिरचीची लागवड शेड नेटमध्ये केल्यास वरीलप्रमाणे तापमान व सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करावी. शेडनेट हाउसमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीची लागवड यशस्वीपणे करता येते, परंतु शेडनेटमधील सिमला मिरची फळांचे उत्पादन हरितगृहांतील उत्पादनापेक्षा सरासरी 30 ते 40 टक्के कमी येते. महाराष्ट्रातील शेतकरी हरितगृहात आणि शेडनेट हाउसमध्ये सिमला मिरचीची लागवड करीत आहेत. एकंदरीत सिमला मिरचीचे हरितगृहात उत्पादन घेण्यासाठी रात्रीचे तापमान 18 अंश ते 20 अंश सेल्सियस, दिवसाचे तापमान 21 अंश ते 24 अंश सेल्सियस सापेक्ष आर्द्रता 70 ते 75 टक्के आणि प्रकाशाची तीव्रता 50,000 ते 60,000 लक्स असणे आवश्यक असते.
हरितगृहातील आणि शेडनेट हाउसमधील माध्यम
हरितगृहात किंवा शेडनेट हाउसमध्ये लाल माती, शेणखत, वाळू, भाताचे तूस यांची शिफारस केल्याप्रमाणे. (लाल माती-70 टक्के, शेणखत -20 टक्के, भाताचे तूस-10 टक्के याशिवाय अन्य सेंद्रिय पदार्थ उदा. निंबोळी पेंड, बोनमिल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट खतांची पायाभूत मात्रा यासारख्या गोष्टी वाफे करताना त्यात घालाव
最新バージョン 3.0 の更新情報
APKPureアプリで超高速かつ安全にダウンロード
Android で XAPK/APK ファイルをワンクリックでインストール!