Over कापूस लागवड #Agrownet™
Hoe en wanneer katoen telen ्रोGrovan Cotton Planting Technology # Agrowone®
कापूस पिकाची लागवड पाण्याचा निचरा होणा-या व जलसंधारणशक्ती उत्तम असणा-या मध्यम ते भारी जमिनीवर करावी. उथळ/कमी खोली असणा-या व हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करु नये. तसेच पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीन कपाशीला हानिकारक असते.
जमिनीची मशागत
नांगरणीमुळे जमिनीमध्ये कठीण थर तयार झाला असल्यास तो फोडला जातो. कोरडवाहू लागवडीसाठी भारी व काळ्या जमिनीमध्ये दोनतीन वर्षांनी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करावी. यामुळे मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या ३0 सें.मी. रुंदीच्या स-या पाडाव्यात.
सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. जलधारणाशक्ती वाढते, हवा खेळती राहते आणि अन्नद्रव्य उपलब्ध व विद्राव्य करुन देणा-या जिवाणूची संख्या वाढण्यास मदत होते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात सकारात्मक बदल होतो. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी ५ टन (१०-१२ गाड्या) व बागायती लागवडीसाठी १0 टन (२०-२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत शेतात मॅग्रेशियम, झिंक इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण वाढते.
पिकांची फेरपालट
पीकपद्धतीचा प्रकार (निखळपीक, मिश्रष्पीक, आंतरपीक) अवलंबून असतो. कोरडवाहू क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकानंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बी टी कापूस वेचणी लवकर येत असल्यामुळे बी टी कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीकपद्धती फायदेशीर आहे.
वाणांची निवड
सध्यस्थितीत बाजारात अनेक बी टी कपाशीचे संकरित वाण उपलब्ध आहेत. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम होत आहे. बी टी कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित वाण असावा. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडाचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. बागायती लागवडीसाठी पुनर्बहारक्षमता असणारा वाण निवडावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणा-या बोंडाचा सुध्दा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते. बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा. ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगला मिळू शकेल. वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील स्वतःचा अनुभव तसेच आपण स्वत: अन्य शेतक-यांच्या शेतावरील पीक पाहून बी टी कपाशीच्या वाणाची निवड करण्यात यावी. अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांची गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापनानुसार लागवड न केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल.
What's new in the latest 1.0
कापूस लागवड #Agrownet™ APK -informatie

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!