अन्नपूर्णास्तोत्रम्
हे अन्नपूर्णा माते ! तू सर्वांना नेहमी आनंद देणारी आहेस. तू एका हाताने वरमुद्रा आणि दुसऱ्या हाताने अभयमुद्रा धारण केली आहेस. तू सर्व प्रकारच्या रत्नांची खाण आहेस. तू सर्व पातकांचा सम्पूर्ण नाश करणारी असून प्रत्यक्ष महेश्वराची प्राणवल्लभा आहेस. तू जन्म घेऊन हिमालयाचा वंश पवित्र केला आहेस. तू काशी नगरीची अधीश्वरी आहेस. कृपापूर्ण दृष्टीने आधार देऊन हे आई, अन्नपूर्णेश्वरी मला तू भिक्षा दे. जिच्या हातामध्यं अनेक प्रकारचीं रत्नजडित आश्चर्यकारक भूषणें आहेत, जिच्या सिंहासनाच्या प्रभावळीवर सोन्याचे भरजरी वस्त्र शोभत आहे, जिच्या वक्षःस्थलावर मोत्यांचे हार शोभा देत आहेत, केशर, कस्तुरी, अगरू, चंदन ह्यांचे उटणें अंगाला लावल्याने जिचे अंग अधिक शोभत आहे,