मोसंबी लागवड #Agrownet™
4.2
Android OS
關於मोसंबी लागवड #Agrownet™
如何以及何時種植柑橘 ॲGrovan 柑橘種植技術 # Agrowone®
जमीन ही मध्यम भारी तसेच एक मीटर खोल व उत्तम निच-याची असावी.
फार हलकी व अति भारी तसेच चिवट जमिनीत मोसंबी लागवड कस्त नये.
जमिनीत मुरुम चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असते, त्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळते.
जमिनीचा सामू६.५ ते ८.0 एवढा असावा.
चोपण, क्षारयुक्त, पाणथळ जमिनीत मोसंबी लागवड करू नये. प्रमाण 0.१ पेक्षा कमी असावे.
हवामान
कमी पावसाच्या हवामानात मोसंबीची वाढ उत्तम प्रकारे होते.
सुधारित जातीची निवड
न्युसेलर
अनेक सुधारित जाती वेगवेगळ्या भागांसाठी व अधिक न्युसेलर या जातीची उत्पादनक्षमता अधिक असल्याने ही जात उपयुक्त मानली जाते.
फळांची साल घट्ट, पातळ, चमकदार चोपडी असल्यामुळे फळांचा आकर्षकपणा वाढतो; त्यामुळे बाजारात अधिक भाव मिळतो तसेच फळे तोडणीनंतर जास्त दिवस टिकतात.
रंगपूर खुटावरील झाडे विषाणुजन्य रोगांना प्रतिकारक्षम जास्त काळ व जातीचे आयुष्यही जास्त असते.
सालगुडी
फळे एकसारख्या आकाराची असतात.
रसाचे प्रमाण न्युसेलरपेक्षा जास्त आहे.
फळातील साखर व आम्ल प्रमाण निसर्गत: संतुलित राहत असल्यामुळे रस अधिक स्वादिष्ट लागतो.
फळांचा दर्जा मोठ्या प्रमाणावर चांगला असतो. ३५ अंश सें. तापमान व अधिक काळ राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रसार झपाट्याने होतो. चांगली व उत्तम प्रतीची मोसंबी फळे तयार होण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण ६५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. भरपूर सूर्यप्रकाशात मोसंबी वाढ चांगली होऊन फळेही लवकर तयार होऊन आकार वाढतो.
कलमांची निवड
मोसंबीची कलमे सरकारी किंवा नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करावीत.
मोसंबी कलमे रंगपूर खुटावरील घेण्याचा प्रयत्न करावा.
कलमे सरळ वाढलेली जोमदार, रोगमुक्त असावीत.
कलमांची उंची ही जमिनीपासून २ ते ३ फूट असावी.
डोळा भरलेला भाग हा २० ते ३० सेंमी. जमिनीपासून उंच असावा.
लागवड़
लागवडीसाठी तयार केलेल्या खडुयामध्ये चांगले कुजलेले शेणखत १५ ते २० किलो सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो तसेच १oo ते १५० ग्रॅम कार्बोरील भुकटी १० टक्के खडे जमिनीच्या पृष्ठभागावरील चांगल्या मातीत किंवा गाळाची माती मिश्रणाने भरावेत व जमिनीपासून १० ते १५ सेंमी. उंच भरावेत.
कलमांचा जोड जमिनीपासून २० ते २५ सें.मी. उंच ठेवावा. कलमांची लागवड सायंकाळी किंवा सूर्यास्तापूर्वी करावी.
कलम लावल्यानंतर मुळाभोवती माती चांगली दाबून घ्यावी, जेणेकरून माती पोकळ राहणार नाही. कलमांच्या डोळ्याची दिशा वा-याच्या दिशेस ठेवावी.
कलमांची लागवड करताना ०.२ टक्के तीव्रतेच्या बुरशीनाशक द्रावणात ३ मिनिटे बुडवून ठेवावीत.
पाणी व्यवस्थापन
सिंचनाचे पाणी झाडाच्या खोडापर्यंत जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दुहेरी रिंगण पद्धतीने मोसंबीस पाणी द्यावे. या पद्धतीत झाडाच्या बुंध्याजवळ २ फूट लांब आणि २ फूट रुंद आकाराचे चौकोनी अळे करावे व दुसरे अळे ४ ते ६ फूट रुंद आकाराचे करावे. त्यामुळे पाण्याचा संपर्क झाडाच्या बुंध्याशी येणार नाही. ठिबक पद्धतीने मोसंबी बागेस पाणी व खते दिल्यास अधिक फायदेशीर ठरते.
最新版本1.0的更新日誌
在APKPure極速安全下載應用程式
一鍵安裝安卓XAPK/APK文件!