एक भयानक प्रवास
माझ्या बहिणेचे सासरे हाडाचे शेतकरी…भीती त्यांना तशी नव्हतीच..शेतामध्ये कधीही रात्री अपरात्री जाऊन जायचे..भूतान प्रेतांन्ना ते घाबरायचे नाही पण त्यांचा असल्या गोष्टींवर त्यांचा थोडा फार विश्वास होता.. त्यामुळे ते रात्री अपरात्री बाहेर भटकताना जर जपूनच राहायचे… एकदा त्यांना काही कामानिमित्त रात्री बाहेरगावी जाव लागणार होत आणि त्या रात्री नेमकी अमावस्या होती.. म्हणून बहिणीचे सासरे नी सोबतीला त्यांच्या भावाला ही घेतलं..भावाला भूताखेतन बद्दल खूप माहिती होती पण देव गण असल्यामुळे कधी दिसलं नाही.. त्या दोघांनी सोबत बैलगाडी घेतली… बैलगाडी घेऊन ते संध्याकाळी प्रवासाला निघाले.. बैलजोडी तशी जुनीच होती.. जोडीला रस्ता चांगलाच पाठ झाला होता.. त्यामुळे हे दोघे त्या जोडीवर विसंबून राहून मस्त गप्पागोष्टी करत होते… बैलांनी त्यांना अगदी मोक्यात पोहोचवलं पण त्याचं काम उरकायला थोडा वेळ लागला त्यामुळे त्यांना रात्री परतायला उशीर होणार होता… त्याचं काम ११ वाजता संपल काम संपल्यावर ते तडक गावाला यायला निघाले.. १२ :३० पर्यंत त्यांनी अर्धा रस्ता पार केला होता..आता जे ज्या ठिकाणी होते तिथून गावाला जायला २ रस्ते होते एक मुख्य रस्ता..हा रस्ता तसा कमी धोक्याचा होता पण रात्रीचे या रस्त्यावर लुटारू असायचे.. त्या रस्त्याला लागुनच एक जंगल आहे.. जंगलाच्या त्या पलीकडे गाव हा रस्ता त्या घनदाट जंगलाला विळखा घालून गावात आणून सोडतो.. या रस्त्याने गेले असते तर चांगलेच २ तास लागले असते.. दुसरा जंगलातला रस्ता…जंगलातून एक छोटा कच्चा रस्ता आहे . तो सरळ गावात आणून सोडतो.. अर्धा तास लागतात फारतर पण त्या जंगलाशी निगडीत खूप काही रहस्य कथा होत्या.. म्हणून तिथे कोणी दिवसा ही जायची हिम्मत करायचं नाही..जंगलाच्या रस्त्याने जायचं झाल तरी गटा गटाने जायचे.ती बैलजोडी अस गटा गटाने जाताना अनेकदा त्या रस्त्यावरून गेली होती..त्यामुळे तिला हा रस्ता थोडा फार तरी ओळखीचा होता.. मुख्य रस्त्याने गेले असते तर चांगलाच उशीर झाला असता.. एकतर अमावस्या आणि त्यातच लुटारूंची भीती म्हणून सासर्यांनी आणि त्यांच्या भावाने जंगलातून जायचं ठरवलं.. फक्त अर्धा तासच काढायचा आहे तर गप्पा करत करत काढू तो बैलांना हाकायचीही गरज नव्हती तशी असा विचार करून त्यांनी जंगलातून जायचं ठरवलं आणि इथूनच भयाण घटनाक्रमांचा प्रारंभ झाला अस म्हणतात की फार पूर्वी त्या जंगलात अमावास्येला भूत जमायची.. जमायचं कारण काय ते कधी कोणाला कळालंच नाही… पण त्या रात्री खूप आरडा ओरडा करायची भूत कधी कधी तर बायकांच्या किंचाळण्याचे आवाज सुध्दा यायचे… अमावास्येच्या रात्री जंगलाच्या आजूबाजूच्या गावातील मोठी जाणकार लोक हट्टाने जंगलाबाहेर गस्त द्यायचे..जंगलातून येणाऱ्या सगळ्या रस्त्यावर रात्रभर पाळत ठेवायचे . त्या रात्री कोणाला जंगलात प्रवेश करून देत नव्हते… पण हळू हळू जंगलात घडणाऱ्या विचित्र घटनांच प्रमाण कमी होऊ लागल . गेल्या ३० वर्षात तरी अस काही अमावास्येच्या रात्री घडल नव्हत, जंगलातून येणारे चित्र विचित्र आवाजही आता बंद झाले होते..म्हणून गावातले लोक ही हळूहळू त्या घटनेकडे दुर्लक्ष करायला लागली.. त्या जंगलातल्या भूतांचा आता सगळ्यांना विसर पडला.. कोणी त्या कडे लक्ष ही देईना.. पण अमावास्येच्या रात्री त्या जंगलात काय चालायचं हे लोकांना कधीच कळाल नाही… बैलजोडी जंगलाच्या आत शिरली..कच्च्या रस्त्याने ठसके खात खात चालली होती . त्या घनदाट जंगलात काही दिसत नव्हत.. तारांच्या मंद मंद प्रकाशात बैलगाडी चालली होती..हे दोघ भाऊ आपापल्या गप्पात रंगले होते जंगलात एक फाटा लागतो त्या फाट्याच्या उजवीकडे जाणारा रस्ता हा गावात घेऊन जातो आणि डावीकडचा त्या भयाण जंगलाच्या गर्भात… Haunted journey