About पडवळ लागवड #Agrownet™
How and When to Plant Padwal ॲGrovan Padwal Planting Technology # Agrowone®
पडवळ लागवड करण्यापूर्वी
फळे ०.५-१ मी. लांब व सुमारे ७ सेंमी. व्यासाची, दोन्ही टोकांना निमुळती असून कोवळेपणी हिरवी व त्यावंर पांढरे पट्टे असतात. दुसऱ्या प्रकारची फळे गर्द हिरवी असून त्यांवर पिवळसर किंवा फिकट हिरवे पट्टे असतात. फळे सापासारखी दिसतात, म्हणून स्नेक गोर्ड हे इंग्रजी नाव पडले आहे.
जमीन व हवामान
पडवळ लागवडीस चांगला निचरा असणारी अर्धा ते एक मीटर खोलीची जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीत या पिकांची लागवड करू नये. या पिकांना उष्ण हवामान मानवते, म्हणून यांच्या लागवडी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात.
लागवडीची पद्धत
सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. जाती नुसार दोन वेलीमधिल अंतर २०० बाय १२० सेंमी ठेवावे. खुरपीच्या सहाय्याने ३ ते ४ बियांची लागवड करावी.
सुधारित जाती
१) कोईंबतूर -४ :
ही पडवळाची सुधारित जात असून ६० दिवसांत फळे तयार होतात. फळाची लांबी १६० ते १९० सेंमी इतकी असते. फळांचा रंग गडद हिरवा असून त्यावर पांढऱ्या रेषा असतात. गर फिकट हिरव्या रंगाचा असून पेरणीपासून ७० दिवसांत पहिली काढणी येते. एका वेलीला १० ते १२ फळे येतात.
२) कोकण श्वेता :
कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या वाणाची फळे ९० सेंमी लांब असतात. फळाचा रंग हिरवट पांढरा असून त्यावर तुरळक रेषा असतात. एकरी उत्पादन ६ ते ८ टन मिळते.
या व्यतिरिक्त पडवळाचे कोईंबतूर १ आणि टी.ए १९ हे दक्षिण भारतात प्रचलित सुधारित वाण आहेत. टी.ए.-१९ या वाणाची फळे ६० सेंमी लांब, किकट हिरव्या रंगाची, पांढरे पट्टे असलेली असतात. सरासरी एकरी उत्पादन ८ टन एवढे येते.
बीज प्रक्रिया
लागनीपूर्वी बियायान्यास प्रती किलो प्रमाणे २० ग्रॅम बाविस्टिन याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. ट्राइकोडर्मा विरडी २५० ग्रॅम १० किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होते.
पाणी व अन्नद्रव्ये व्यवस्थापन
पडवळ पिकास करीता पेरणी पूर्वी प्रति एकर १० ते १२ टन शेनखत द्यावे. लागवड करताना प्रति एकर २० किलो प्रमाणे नत्र, स्फूरद, पालाश द्यावे. लागवडीनंतर ३० दिवसांनी परत २० किलो नत्राची मात्रा द्यावी.
किड व रोग नियंत्रण
लाल भुंगेरे, फळ माशी, इत्यादी किडींचा तसेच भुरी, केवडा, करपा, इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करुन तज्ञांच्या मार्गदर्शनाने किड व रोगांचे नियंञण मिळवावे.
विशेष काळजी
पडवळाची काढणी फळे कोवळी असतांनच करणे आवश्यक आहे; कारण काढणीस उशीर झाल्यास साल व बी कठीण बनतात व त्यामूळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर फरक पडतो.
What's new in the latest 6.0
पडवळ लागवड #Agrownet™ APK Information
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!







