मराठी भयकथा
नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला आत्मा, भूत यांचे विषयी माहिती देणार आहे..,म्हणजे च की, भूत(प्रेतआत्मा) म्हणजे नेमकं काय असते, एखादी आत्मा भूत (प्रेतआत्मा) कशी बनते..त्यांचे प्रकार कित्ती…इत्यादी सर्व प्रथम… आपण आत्माविषयी जाणून घेऊया…जो तुमच्या आमच्या मध्ये प्रत्येक सजीव, जिवंत प्राणिमात्रांण मध्ये सामावलेला आहे त्याचे विषयी…म्हणजेच तुमच्या आत्म्या विषयी जाणून घेऊया… आपल्या हिंदू धर्म ग्रंथप्रमाणे आत्मा एक विश्वव्यापी अविनाशी(विनाश न पावणार) तत्त्व आहे पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते.आता नीट ऐका..तुमच्या आत्म्याविषयी आहे…सर्वकर्मा सर्वकामा: सर्वगन्धा: सर्वरसह: सर्वमिदं अभ्यात्तोवाक्यानादार: एष म आत्मान्तर्ह्रिदये एतत ब्रम्ह: एतं इति: ई (छांदोग्य उपनिषद ) अर्थ…..तो(तुमच्यातीलआत्मा),ज्याच्या मुळे ह्या सर्व दृश्य व अदृश्य जगाचे अस्तित्व आहे,ज्याच्या मध्ये हे सर्व समाविष्ट आहे व या सर्वां मध्ये जो सुप्रतीष्टापित (प्रमाणीकरण केले )आहे.तो(तुमच्यातील आत्मा), जो सर्वकर्मांचा,कामांचा,गंधांचा आणी रसांचा जनिता( जन्म)व भोगता असूनही कर्म ,काम ,गंध आणी रस रहितआहे.तो इंद्रिय रहित, निराकार व निर्गुण आहे…असा तो परब्रम्ह:म्हणजेच माझा (सर्वांचा) आत्मा आहे.जो माझ्या ह्रिदयकमळांत (हृदय) विराजमान आहे.. आत्म्याबाबत श्रीमद्भगवद्गीतेत दिलेली माहिती वर्णन असे आहे की,अविनाशी, जो मरत नाही, कोणाला मारत नाही,शाश्वत व पुरातन आहे, शरीर नाश पाविले तरी हा नाश पावत नाही…अजन्मा, अव्ययी, न कापता येण्याजोगा..,न जळणारा..,न भिजणारा..,न सुकणारा..,अचल.., सनातन..,अव्यक्त..इंद्रियांना अगोचर..,अचिन्त्य..,अविकारी असा हा आत्मा आहे. आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. हा आलाही नाही की गेलाही नाही. हा स्थिर आहे- पुरातन आहे. देहाला मारले तरी हा मरत नाही. याला शस्त्रे मारू शकत नाहीत. त्याला अग्नी जाळू शकत नाही. याला पाणी भिजवू शकत नाही की याला वारा वाळवू शकत नाही. हा सर्वव्यापी आहे. याला पाहता येत नाही. याची कल्पना करता येत नाही. हा निविर्कार आहे असा हा तुमचा आमचा आत्मा आहे…असो, आत्म्याची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात (तुमचा आमचा आहे तो) जेव्हा या जीवात्मा चा वासना आणि कामानामय शरीरात निवास होतो तेव्हा त्याला प्रेतात्मा म्हणतात..हिच आत्मा जेव्हा सूक्ष्मतम शरीरात प्रवेश करते तेव्हा त्याला सूक्ष्मात म्हणून संबोधले जाते… वासना अतृप्त असताना, अकाली, बाळंतपणात, रजस्वला असताना, अपघात तसेच विश्वासघात, आत्महत्या इ. कारणांनी मृत्यू आल्यास व्यक्ती भूत बनते. भूताप्रेतांची गती तसेच शक्ती अपार असते यांचे वेगवेगळे प्रकार असतात.हिंदू धर्मातात गती व कर्मनुसार मेलेल्या जीवांचे वर्गीकरण केले जाते.भुता ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते…आयुर्वेदात 18 प्रकारचे प्रेतात्मा आहेत असे सांगितले आहे, तसेच पिचाश, प्रेत, आसरा, डाकिन, शाकिन, ब्रह्मसमंध, मुंजा, गिऱ्हा, लावसटीन, हडळ, हाकाट्या, वेताल, खवीस, कृष्मंडा, क्षेत्रपाल, मानकाप्या, कर्णपिचाश, विरीकास असे अनेक प्रकर सांगितले जातात या प्रेतयोनीत जाणारे लोक अदृश व बलवान बनतात परंतु सगळेच मरणारे जीव प्रेतयोनीत जात नाहीत वा सगळेच बलवान होत नाहीत. ते आत्माच्या कर्म व गतीवर अवलंबून असते. भूता मध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामधील काही खालीलप्रमाणे प्रेत :- जेव्हा एखादी व्यक्तीचा हिंसात्मक मृत्यू होतो आणि त्याचा अंत्यविधी केला जात नाही तेव्हा तो जीव प्रेत बनतो . प्रेत हे खूप स्वार्थी आणि शक्तिशाली असत. हडळ :- दिसायलाच या भयानक असतात .हिच्या अंगातून एकप्रकारचा घाणेरडा वास येतो , सडलेल्या अंड्या सारखा . अनेक वेळा ह्या कबरीतून प्रेत काढून ते मांत्रिकाला देण्याच काम करतात . मांत्रिकाला लागणारी कवटी , हाडे सुध्धा ह्या पुरवतात . हडळी ह्या माणसांचा ताबा घेतात आणि नंतर त्यांना मारतात. शाकिन- लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मरण पावण्यार्या तसेच अपघातात मृत्युमुखी पाडणाऱ्या स्रीया शाकीन बनतात. डाकिन- डाकिन हे हडळ व शाकीन चे मिळतेजुळते रूप आहे.ज्या स्रीयाचा हिंसात्मक मृत्यु होतो त्या स्रीया डाकिन बनतात.डाकिन या दिसायला खुप कुरूप व शक्तिशाली असतात. त्या नेहमी आपल्या हत्या बदल्यचा फिराक मध्ये असतात. जखिन : जखिन नाव घेताच एक चिञ विचिञ प्रतिमा डोळ्या समोर उभी रहाते.जी स्ञी बाळंतपणा नंतर दहा दिवसात मरते किंवा विटाळात मरते. किंव्हा जिचा नवरा जिवंत आहे. पण असंख्य यातना घेऊन जी मरते तीला जखिन म्हणतात.आपल्या शञूनां ञास देण्यासाठी लोक हीचा वापर करतात. जी हिंदू स्त्री बाळंतपणात मरते व भूत होते तिला ‘ अलवंतीण ‘असे म्हणतात ! हॉस्पिटल