K.N.S.M. KURIES Pvt. Ltd.
काही काळा पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत होता. परंतु भारत आता जगातला सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश झालाय. परंतु हे सोने प्रत्येकाकडे आहे का? तर नाही . काही पैशावाल्यांनीच भरपूर सोने घेऊन ठेवले .म्हणजेच सोने अति- श्रीमंत नि श्रीमंत व्यक्तीचीच मक्तेदारी होऊन बसलीय सर्वसामान्यांना सोने मिळणे अतिशय अवघड आहे. कारण काय? तर एकतर सोने मूल्यवान असल्याने ते महाग आहे. दुसरे कारण त्याची मागणीही अधिक आहे?सोन्याची मजुरीही खूप जास्त.याशिवाय सोने हे सोन्याची पूर्ण किंमत, मजुरी आणि सरकारी कर यांची एकत्रित रक्कम एकरकमी भरल्याशिवाय मिळत नाही.सोने हफ्त्यावर मिळत नाही. सोने क्रेडीट कार्ड वर घेतल्यास त्याचे EMI होत नाहीच नाही .तर त्यावर अधिक व्याज आकारले जाते.सोने घेण्यासाठी कर्ज उपलब्ध होत नाही.सरकारकडे सोने घेण्यासाठी कोणतीही योजना नाही असे असूनही भारतीयांची सोन्याची क्रेझ काही कमी होत नाही. मग हे सोने मिळण्यासाठी महिनेंमहिने धडपड करायची सोनाराकडे मासिक भरणा करायचा, तोही विना गॅरंटी. त्याला पैसे द्यायचे आणि मग १४ महिन्यानंतर सोन घ्यायचं. हा जोखमीचा प्रवास किती मोठा ? म्हणून एक संकल्पना सुचली की अशी योजना करायची की दैनंदिन एका वर्गानिदाराला मिळणाऱ्या धनादेशाद्वारे त्याला सोने अगोदर मिळेल.