このMaratha Familyについて
मराठासमाजालाएकत्रआणण्यासाठीह्याएप्लिकेशनचीसुरुवातकरण्यातआलीआहे。
आज तब्बल ४०० वर्षांनी मराठ्यांमधे एकीची भावना जाग्रत होतो आहे. पण यासाठी एका मराठा भगिनीला आपला जीव गमवावा लागला. त्या बलिदानातून प्रज्वलित झालेली मराठा क्रांती मोर्चाची ज्योत ही आपले उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत सतत तेवत रहावी या मुख्य हेतूने मराठा कुटूंब ची स्थापना करण्यात आली.
मराठा कुटुंब ची कार्यपद्धती ही मुख्यत्वे पुढील बाबींशी निगडीत आहे.
मराठा समाज व्यापार/धंदाच्या बाबतीत प्रचंड मागासलेला आहे. मराठा समाजच्या विकासासाठी आपण एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य मराठ्यांच्याच दुकानातून विकत घेणे आवश्यक आहे.
समाजातील डॉक्टर मंडळी, दवाखाने, वकील ,इंजिनिअर्स, कापड व्यवसायिक,किराणा दुकानदार, कारागिर,इ. सर्व मराठा प्रतिष्ठाने यांची माहीती समाजाला व्हावी.
समाजातील शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन, योग्य सल्ला, बाजारपेठ इत्यादी
मराठा समाजातील विविध समस्या,मराठ्यांवर होणारे अन्याय, मराठा मोर्चा दशा व दिशा, आरक्षण लढाई, विविध विचारवंतांचे लेख इ. माहीती समाजबांधवापर्यंत पोचविणे.
या सोबतच मराठा तरूणांना शैक्षणिक पाञतेनुसार उपलब्ध नोकरीची संधी, स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन,करिअर निवडीसाठी सल्ला,मराठा समाजाच्या जिल्हानिहाय बैठक, तालूका स्तरीय बैठक इ. माहीती समाजापर्यंत पोचवणे.
तसेच वधू वर माहीती उपलब्ध करून देणे.
संपूर्ण समाजाचे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
जय जिजाऊ जय शिवराय.
最新バージョン 1.0 の更新情報
Bug Fixes