This app is for all Marathi NRI's.
अखिल अमिराती मराठी इंडियन्स (AAMI-आमी) नमस्कार मंडळी, आमी परिवारात तुमचे सहर्ष स्वागत. UAE मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेले बरेचसे मराठी भाषिक बांधव कामानिमित्त, उद्योगधंद्यानिमित्त स्थायिक झालेले आहेत. काहीजण अगदी विनासायास सहजगत्या येथे येतात तर काहींना या मायानगरीत येण्यासाठी भरपूर धडपड करावी लागते. आपली मायभूमी सोडून परदेशात आल्यावर सगळ्यांनाच मग तो श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित काहीना काही अडचण येतेच आणि आपल्याला तात्काळ आठवण होते ती सहज उपलब्ध होणाऱ्या आपल्या माणसाची. “कोण हा आपला माणूस”? हा आपला माणूस म्हणजेच अखिल अमराती मराठी इंडियन्स (AAMI – आमी).