Gramgeeta
तुकडोजी महाराजांना 'राष्ट्रसंत' का म्हणतात असा प्रश्न अनेकजण विचारात असतात. देव फक्त मंदिर, मस्जिद किंवा चर्चमध्ये नाही तर तो 'चरा-चरात' आहे, सर्वत्र आहे. तरीही आमचा परिसर अस्वच्छ का, आमचा गाव दु:खी का ? याचं कारण दडलंय देव आणि धर्म याविषयीच्या आमच्या अज्ञानात. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे, त्यायोगे गावाच्या - समाजाच्या व एकूणच देशाच्या विकासासाठी हातभार लावणे यापेक्षा मोठी ईश्वरभक्ती ती काय ? आणि याच मानवसेवेच्या मार्गदर्शक तत्वांचे काव्यमय रूप म्हणजेच तुकडोजी महाराजांनी रचलेली 'ग्रामगीता'. जपान्यांच्या शिस्तीचे किंवा चीनी जनतेच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत इतर देशांकडे आपल्या जखमांवर औषध शोधण्यापेक्षा या ग्रंथाकडे भारतीयांनी योग्य गांभीर्याने बंधने आवश्यक आहे. त्यामुळेच तुमच्या Android फोन साठी 'ग्रामगीता' App च्या स्वरुपात घेऊन येतोय. नक्की वाचा, अनुसरा व इतरांनाही कळवा.