Oписание Tukdoji Maharaj's Gramgita
जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.
Грамгита Тукдоджи Махараджа:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रिल १ ९ ० ९ साली झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होय.त्यांना गुरूमंत्र आडकोजी महाराजांनी दिला. त्यांनी ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इ. ग्रंथांची रचना केली. त्यांनी आपले आयुष्य जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन यावर खर्ची घातले. तुकडोजी महाराजांनी १ ९ ३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते. त्यांच्या अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे. भारतीय नवरचनेच्या संधीकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतिक दिशा दिली आहे. १ ९ ५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकाला एकदोन नाही, तब्बल नऊ प्रस्तावना आहेत. शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणा - या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे. प्रस्तावना लिहिणा - यांत विनोबा, गाडगेमहाराज, मामासाहेब सोनोपंत दांडेकर, दादा धर्माधिकारी, श्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात टॉपची मंडळी आहेत. तर वि. स. खांडेकर, वि. भि. कोलते आणि ग. त्र्यं. माडखोलकर अशी साहित्यातली दादा माणसंही आहेत. शिवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लिहिलं आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची "ग्रामगीता 'म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे ग्रामसंस्कृतीचे रूप होय. तुकडोजी महाराज गावागावाच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत राहिले. त्यांनी खेड्यापाड्याच्या रूपात उभ्या असलेल्या गाव - संस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणि ते ग्रामगीतेतून समर्थपणे व्यक्त झाले.
ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्गार म्हणजे ग्रामगीता होय. तुकडोजी महाराज म्हणायचे, "माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला, अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे, हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा".
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यु ११ ऑक्टोबर १ ९ ६८ रोजी झाला.
Что нового в последней версии 1.6
Информация Tukdoji Maharaj's Gramgita APK
Старые Версии Tukdoji Maharaj's Gramgita
Tukdoji Maharaj's Gramgita 1.6
Tukdoji Maharaj's Gramgita 1.5
Tukdoji Maharaj's Gramgita 1.4
Tukdoji Maharaj's Gramgita 1.0

Супер Быстрая и Безопасная Загрузка через Приложение APKPure
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!