About Shreemat Dasbodh | Shodh Aani
ग्रंथराज श्रीमत् दासबोध हा ग्रंथ श्रीसद्गुरुकृपेचा सामाजिक ग्रंथ आहे.
|| श्री ||
|| श्रीरामसमर्थ ||
ग्रंथराज श्रीमत् दासबोध हा ग्रंथ श्रीसद्गुरुकृपेचा ग्रंथ असून समाजाभिमुख म्हणजेच सामाजिक ग्रंथ आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ग्रंथराज श्रीमत् दासबोध अभ्यासल्या जातो म्हणूनच अशा सर्व अभ्यासकांचा अभ्यास सोपा आणि सुटसुटित ह्वाव्वा या उद्देशानेच या ॲपची निर्मिती केली आहे.
लवकरच या ॲपची उपयोगीता दाखविणार्या ह्विडिओची लिंक comment boxमध्ये मिळेल.
सोबतच श्रीमत् दासबोध आणि श्रीमनाचे श्लोकांवर आधारित दोन अभ्यासक्रमांची ओळख करुन देत आहोत, ज्यामुळे मराठी माणूस यशस्वी उद्योजक आणि अचाट स्मरणशक्तीचा धनी बनू शकतो.
अंतरी नाही सावधनता | येत्न ठाकेना पुरता | सुखसंतोषाची वार्ता | तेथे कैची ?||
आयुष्यात सुखसंतोष पाहिजे तर अखंड सावधानता आणि अविरत यत्नांची जोड हवी नाहीतर
जो शिकण्या तयार नसे | तेथे वैभवास उणे दिसे | अभ्यास सांडता अपयेसे | पाठी लागे ||
म्हणून
सतत अभ्यास करीत जावे | उत्तमोत्तम शिकून आचरावे | करोनी सुख समाधान वाटावे | शिवबा परी ||
तसेच
स्वये आपण कष्टावे | बहुतांचे सोसीत जावे | झिजोन कीर्तीस उरवावे | उत्तमप्रकारे ||
ऐसी कीर्ती करुन जावे | तरीच संसारास यावे | दास म्हणे हे स्वभावे | संकेते बोलिले ||
ज्याप्रमाणे RTOच्या नियमांत खुणा संकेत असतात ते संकेत कळले तरच वाहन चालविण्याचा परवाना मिळतो त्याचप्रमाणे संताच्या वचनातील संकेत कळले की निश्चितच आपली भरभराट होते.
अधिक ते काय लिहावे...
नाना उत्तम गुण सत्पात्र | तेचि मनुष्य जगमित्र | प्रगट कीर्ति स्वतंत्र | पराधेन नाही ||
यशस्वी आयुष्य तुमची वाट बघत आहे !
संवादाकरीता e-mail करा : [email protected]
ॲपवर जाहिरात करण्यासाठी भ्रमणध्वनी : 7774956007
Comment box मध्ये आपला या ॲपबद्दल अभिप्राय अवश्य द्यावा ही नम्र विनंती.
|| जयजयरघुवीरसमर्थ ||
श्रीमत् दासबोध | शोध आणी बोध || ॲपची वैशिष्ठ्ये.
१. Scroll आणि Bookmarksच्या सोयीमुळे संपूर्ण दासबोधात आणि मनाच्या श्लोकात कुठेही मनसोक्त भटकंती करता येते तसेच कुठेही थांबून ओवीचा/ओळीचा आस्वाद घेता येतो.
२. २०० समासातील आणि २०५ मनाच्या श्लोकातील कोणत्याही ओवीला/ओळीला Bookmarkची सोय.
३. शोधलेला शब्द ज्या ज्या ओवीत आणि मनाचे श्लोकांच्या ओळीत आहे त्या सर्व क्रमवार दिसतात, लागलीच Bookmarkची सोय.
४. Bookmark, ओवीक्रमांक आणि ओळक्रमांक यांचे आधारे त्या समासावर किंवा श्लोकावर सहज पोहचता येतं.
५. दासबोध व मनाचे श्लोकांतील कोणताही शब्द शोधणे अगदि सोप्पं.
६. 'दासबोधामध्ये शोधा' यातच मनाचे श्लोकांचा अंतर्भाव करुन प्रत्येक ओळीला श्लोक क्रमांक आणि त्या श्लोकाच्याओळीला स्वतःचा क्रमांक दिला आहे जेणेकरुन 'श्रीमनाचे श्लोक' > 'श्लोकामध्ये शोधा' त श्लोकातील त्या ओळीचे स्थान चटकन बघता येते.
७. शोधलेला तेवढा शब्द पिवळ्या रंगात दिसतो.
८. समासातील प्रत्येक ओवीला दशक क्रमांक, समास क्रमांक आणि तिचा स्वतःचा क्रमांक दिल्याने 'अनुक्रमे शोधा' यात समासातील त्या ओवीचे स्थान पटकन पहाता येते.
९. दासबोधाच्या भक्कम आधारे तयार केलेला कोर्स. 'Masterstrokes of Management from Dasbodh' आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला धार आणणारा हा कोर्स आत्मसात करुन सेल्स, मॕनेजमेंट आणि मार्केटिंग मध्ये कौशल्ये मिळवा.
१०. आपल्या स्मरणशक्तीला बळकट करा. 'विसरलो/विसरली' नावाचा रोग दुर ठेवणारा मनाच्या श्लोकावर आधारित कोर्स.
'Mind Your Mindpower from Manache Shlok'
या कोर्सच्या माध्यमातून स्मरणशक्तीला प्रशिक्षित करुन तिचा विकास साधा.
What's new in the latest 2.0
Shreemat Dasbodh | Shodh Aani APK Information
Old Versions of Shreemat Dasbodh | Shodh Aani
Shreemat Dasbodh | Shodh Aani 2.0

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!