वारकरी सांप्रदायाला इंटरनेट पोर्टल द्वारा जगाच्या नकाशावर आणत आहे
मंडळी , गायनाचार्य , मृदंगाचार्य , टाळकरी , वीणेकरी , विठ्ठल- रखुमाई व वारकरी सांप्रदायातील संतांची मंदिरे , वारकरी शिक्षण संस्था , वारकरी सांप्रदायाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, या सर्वांची सविस्तर माहिती प्रकाशित व प्रसारित करून वारकरी सांप्रदायाचे विश्वव्यापक स्वरूप संपूर्ण जगासमोर मांडण्याचा संस्थेचा मानस आहे . या शिवाय शालेय , महाविद्यालयीन तसेच वारकरी संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल लायब्ररी व ऑनलाईन अभ्यासक्रमाचा सुद्धा या मध्ये समावेश असणार आहे.