About VGYAN
An online teacher training program by VIBGYOR
‘विग्यान’ (VGYAN) हे के-१२ शिक्षकांसाठी एक ऑनलाइन प्रशिक्षण
अॅप आहे, ज्याच्या व्यासपीठावर आजमितीला ४००० नोंदणीकृत शिक्षक आहेत.
शिक्षकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी ‘विग्यान’ या वैशिष्ट्यपूर्ण अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. आज माहिती क्षेत्राचा झालेला विस्तार आणि विजेच्या वेगाने होणारी तांत्रिक प्रगती या युगात विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गामध्ये अर्थपूर्णरित्या अभ्यासात व्यस्त ठेवणे आणि उत्तम कामगिरीसाठी प्रवृत्त केले जाणे सर्वात आवश्यक आहे.
हे अॅप सर्व शिक्षक, पर्यवेक्षक आणि शिक्षण व्यवस्थापक तसेच शाळा प्रमुखांना अनेक उच्च पातळीवरील अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी देते. विद्यार्थ्यांना वर्गात मुलभूत ज्ञान आणि कौशल्ये शिकविण्याबाबत आज २१ व्या शतकातील शाळांना शिक्षण मसुद्याद्वारे ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार हे अभ्यासक्रम मूलभूत ज्ञान आणि कौशल्ये यावर लक्ष केंद्रित करतात. हे अभ्यासक्रम शिक्षणाबाबतचे दृष्टीकोन आणि कार्यपद्धती यावर नव्याने काम करतात आणि त्याचवेळी हे अभ्यासक्रम काही चांगल्या समकालीन शैक्षणिक पद्धतींचाही पुरस्कारही करतात.
शिक्षणाच्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक्रमातील विषयांची काळजीपूर्वक निवड करण्यात आली आहे. जसे की,
• शिक्षण, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन
• शिकणाऱ्या व्यक्तीला समजून घेणे
• विशेष गरजा असलेल्यांसाठी शिक्षण
• शाळांची सुरक्षितता
• आरोग्य आणि पोषण
• व्यावसायिक कौशल्ये
प्रत्येक क्षेत्रासाठी तयार केलेले अभ्यासक्रम हे अर्थपूर्ण व हेतुपूर्ण ज्ञान देणे, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहाकडे वळवणे, शाळेतील सुरक्षा व सुरक्षित वातावरणास बढावा देणे, विद्यार्थ्यांमध्ये चांगले आरोग्य आणि पोषण यास प्रोत्साहन देणे आणि शिक्षणातील तंत्रज्ञानाचा फायदा घेणे यासारख्या समकालीन शैक्षणिक पद्धतींची आवश्यकता अधोरेखित करते.
वैशिष्ट्ये
कधीही आणि कुठूनही शिका: शिक्षणाच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपण कोठेही, कधीही, इंटरनेटद्वारे किंवा मोबाइल अॅपद्वारे प्रवेश करू शकता. ऑफलाइन मोड मध्ये जाऊनही तुम्ही अभ्यासक्रम पाहू शकता.
तुमच्या सोयीनुसार शिका: अभ्यासक्रम स्वयम प्रगतीशील असून ऑनलाईन प्रशिक्षण तंत्रज्ञानाने युक्त आहेत. एखाद्याला त्याच्या सोयीनुसार अभ्यासक्रमाच्या सामग्रीसह तो अभ्यासक्रम खंडित न करता पूर्ण करता येण्याची सोय इथे उपलब्ध आहे. हा कोर्स लहान मोड्यूल्समध्ये विभागला गेला आहे, ज्यामुळे शिक्षकांना एका वेळी मुख्य संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यास, त्यांच्यासाठी सोयीस्कर असलेल्या पद्धतीनुसार व त्यांच्या वेळेनुसार शिकण्यास मदत होते.
मित्रांसमवेत शिका: हा पर्यायही या अभ्यासक्रमासाठी खुला आहे. हे व्यासपीठ सहभागींना त्यांच्या आवडीच्या विषयांवर समवयस्क सहकार्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देते. सहभागी शिक्षक संबंधित विषय घेऊन मंचावर चर्चा आयोजित करू शकतात, सर्वोत्तम पद्धती आणि कल्पना सामायिक करू शकतात आणि अध्यापन क्षेत्रातील मोठ्या समुदायाकडून मार्गदर्शन घेऊ शकतात.
तज्ज्ञांकडून शिका – हे व्यासपीठ सहभागींना शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देते. हा पर्याय स्वयंअध्ययनात मदतीचा हात देतो. अशा संवादांद्वारे शिक्षकांना तज्ज्ञांची मते जाणून घेता येतात व वर्गात अंमलबजावणी करण्याविषयी व्यावहारिक सल्ला दिला जातो.
कथानकाच्या आधारे शिका – ऑनलाईन लर्निंग मॉड्यूल्स शिक्षण प्रणालीतील दृश्य प्रणाली किंवा कथानकांचा आधार घेतात. जे शिकण्याच्या आकलनास मजबूत करण्यासाठी वास्तविक-जीवनातील परिस्थितींचा वापर करते. शिक्षणाचा हा प्रकार अध्यापनकर्त्यास त्या विषयाशी चांगल्या प्रकारे बांधून ठेवतो. ही पद्धत शिक्षकांना वर्गात येणार्या प्रत्यक्ष अनुभवांच्या जवळ घेऊन जाणारी असल्यामुळे तो विषय त्यांना अधिक प्रभावीपणे समजतो.
दृश्यमान स्वरुपात शिका - ऑनलाइन सामग्रीच्या आधारे शिकण्याच्या सुलभतेसाठी व त्यादृष्टीने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि ते अधिक चांगले समजावे यासाठी अभ्यासक्रमाला दृश्यमान (Visualization) स्वरुपाची जोड देण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या मांडणीसाठी परस्परसंवादी व्हिज्युअल नकाशाची मदत घेण्यात आली असून यामुळे सहभागींना संरचित स्वरूपात माहितीचे अर्थ लावणे व ते अंतर्भूत करणे सोपे जाते.
What's new in the latest 1.1
VGYAN APK Information

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!