About USK Agro
बीज म्हणाले धरतीला आता काळजी कशाला ? जर USK असेल सेवेला मी जाईन गगनाला !
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन १९९९ साली 'युएसके' अॅग्रो सायन्सेस ची स्थापना झाली. ' द कंपनी ग्रोविंग वुईथ ग्रोवर ' हे ब्रीद वाक्य घेऊन शेतकऱ्याला मोठे करत मोठी होणारी कंपनी असा नावलौकिक युएसकेने जपला आहे. शेतीतील अनुभवी व कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या लोकांची कंपनी 'युएसके अॅग्रो सायन्सेस ' याचा अर्थ मुळातच युनायटेड सर्व्हिसेस फॉर कास्तकार वुईथ द हेल्प ऑफ अॅग्रीकल्चर सायन्स ! कृषी शाश्त्राच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मदत करणारी, त्यांचे जीवन सुखकर व आनंददायी बनवणाऱ्या या कंपनीचा विस्तार आज महाराष्ट्र, कर्नाटक बरोबरच गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या महत्वपूर्ण राज्यांमध्ये झालेला आहे. शेती औषधे, खते (स्पेशालिटी फर्टीलायझर्स ), संजीवके, बायोफर्टीलायझर्स, ठीबक सिंचन प्रणाली यांची सुविधा एका छताखाली पुरवणारी भारतीय कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असा नावलौकीक युएसकेने निर्माण केला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीक नियोजनासंदर्भात मोफत सल्ला देणारी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, दर्जात्मक पीक व उत्पन्न वाढीसाठी अहोरात्र काम करणारी कंपनी म्हणूनही 'युएसके' ने शेतकऱ्यांच्या मनामनात सर्वोच्च स्थान निर्माण केले आहे. शेतकऱ्यांना फळ पिकांच्या लागवडीची तसेच रोगकिडींची अधिकृत माहिती त्यांच्या बांधापर्यंत मिळावी, यशोगाथांच्या माध्यमातून नवोदित शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 'भूसंवर्धन' मासिक कंपनीतर्फे गेली दशकभर अखंडितपणे सुरु ठेवण्यात आले आहे. भविष्यात शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज, पीकनिहाय माहिती तसेच बाजारभाव व बाजारपेठांसंदर्भात विशेष मार्गदर्शन, माती, पाणी व पर्णदेठ पृथक्करणही अल्प दरात शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच 'भूसंवर्धन' मासिक व 'युएसके' ग्रुप ऑफ कंपनीज फौंडेशन तर्फे शेतकऱ्यांना शेतीमधील संशोधना संदर्भात पुरस्कार वितरण करून शेतकऱ्यांचा गौरव करण्याचा मानस आहे.
आज देशातील २ दशके शेतकऱ्यांच्या सेवेत काम करणारी विश्वासार्य कंपनी म्हणून शेतकऱ्यांच्या मनात स्थान कंपनीने मिळवलेले आहे.
युएसके अॅग्रो सायन्सेस मोबाईल मधील अॅप सुरु करत असून या माध्यमातून फळ पिके, भाजीपाला पिके, नगदी पिके व रोग, किडींची माहिती, संजीवकांचा वापर तसेच पीक कालावधीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात माहिती या अॅप द्वारे पुरविली जाईल. हवामान अंदाज, बाजारभाव व कंपनीतर्फे होणारे नवनवीन संशोधन इत्यादी माहिती टप्याटप्याने या अॅप मधून विनामोबदला पुरविली जाईल.
What's new in the latest 3.0
USK Agro APK Information
Old Versions of USK Agro
USK Agro 3.0
USK Agro 2.0
USK Agro 1.0

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!