
लोकनायक - Loknayak
About लोकनायक - Loknayak
Useful for all Public Representative
*** लोकनायक ***
“आपली, आपल्या पक्षाची, आपल्या गटाची, आपल्या मंडळाची, संस्थेची अथवा कार्यालयाची उपयुक्तता व लोकप्रियता आता घराघरात पोहोचणार !!!”
** अॅप चे उद्दिष्ट व उपयुक्तता :
प्रत्येक लोकप्रतिनिधी, संघटक, सामाजिक कार्यकर्ता, विविध संस्था, कार्यालये आपल्या क्षेत्रात रोज नवनवीन कामे करत असतात किंवा उपक्रम राबवत असतात, जनतेच्या समस्यांचे निवारण करत असतात. परंतु पारंपारिक व्यवस्थापनामुळे या सर्वांची योग्य ती काळजी घेतली जात नाही किंबहुना केलेली कामे ऐनवेळी सांगता येत नाही अथवा लोकांपर्यंत पोहोचविता येत नाहीत.
त्या सर्व कामाचे व्यवस्थित रेकोर्ड रहावे, आवश्यकता असेल त्यावेळी काही क्षणात ती माहिती उपलब्ध व्हावी, वापरकर्त्या जनतेला त्यांच्या समस्या सूचना / तक्रारी मांडता याव्यात, अशा जनतेकडून आलेल्या सूचना / तक्रारी यावर योग्य ती कार्यवाही करता यावी व त्या झालेल्या कार्यवाहीची माहिती पुन्हा जनतेला मिळावी, तसेच आपण केलेल्या विविध कामांची जनतेला माहिती मिळून त्याचा जास्तीत जास्त प्रसार होवून तळागाळापर्यंत पोहोचावे, त्याची जाहिरात व्हावी यासाठी या अॅपचा वापर अत्यंत प्रभावीपणे व कुशलरीत्या करता येतो.
शिवाय सदर अॅप हे अत्यंत आधुनिक असून, सहज उपलब्ध असणाऱ्या मोबाईलवरून दोन्ही (वापरकर्ता जनता ) घरबसल्या कुठेही हाताळू शकतात. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सर्वच बाबी डिजिटल होत आहेत मग आपण या कामी मागे राहून चालणार नाही.
** अॅप कोणासाठी आहे –
** वैयक्तिक पातळीवर : लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता, संघटक, पदाधिकारी / अधिकारी, एखाद्या संस्था / मंडळाचा सदस्य, एखाद्या कार्यालयाचा कर्मचारी / अधिकारी इ.
** गट पातळीवर : राजकीय पक्ष, राजकीय अथवा सामाजिक गट, विविध संघटना, विविध मंडळे, विविध प्रकारच्या सहकारी / खाजगी तसेच सरकारी संस्था, विविध प्रकारची कार्यालये, इ.
** उदाहरण –
१) लोकप्रतिनिधी - ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार इ.
२) संघटना - सामाजिक कार्यकर्ते - सामाजिक, राजकीय, धर्म - जात विषयक, व्यवसाय विषयक संघटना अशा विविध संघटनांचे अध्यक्ष, सदस्य
४) सर्व प्रकारची खाजगी, सहकारी, सरकारी कार्यालये.
५) ग्रामपंचायती - ग्रामपंचायत आपल्या गावासाठी नुसते डिजिटलच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन मोबाईल ग्रामपंचायत म्हणून याचा वापर करू शकते.
६) अशा सर्व व्यक्ती , संघटना किंवा गट ज्यांना काही काळानंतर निवडणुकीस सामोरे जायचे आहे असे संघटन / मंडळ.
७) वैयक्तिक जाहिरात करण्यासाठी सर्वांना उपयुक्त
** अॅप मधील विशेष सुविधा -
1) हे अॅप तुमच्या स्वतःच्या / गटाच्या / संघटनेच्या / कार्यालयाच्या नावाने असेल.
2) हे संबंधित वापरकर्त्या लोकांना सहज व मोफत मिळावे म्हणून Google Play Store वर उपलब्ध केले जाईल.
३) हाताळण्यासाठी अत्यंत सुलभ , मराठी / हिंदी / इंग्रजी सारख्या विविध भाषेतून उपलब्ध.
४) तुम्हाला यातील सुविधा सहज वापरता याव्यात, त्यात तुमच्याच पातळीवर आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करता यावा. म्हणून मोबाईल तसेच कॉम्प्युटरवरील विशेष अॅडमीन अधिकार / सुविधा देण्यात आलेली आहे.
५) हे अॅप ऑनलाइन असल्याने आपण केलेले बदल, जनतेच्या समस्या, त्या वरील कार्यवाही वापरकर्त्याला लगेच दिसणार आहेत.
६) अॅपमधील सर्व बाबी (उदा. केलेली कामे, लोकांच्या समस्यांचे निवारण, बातम्या, व्हिडीओ, संदेश इ.) तुम्हाला स्वतःला भरता येतील, बदलता येतील.
७) आपण केलेल्या विकास कामाचा, समस्या निवारणाचा, उपक्रमांचा विभागानुसार / विषयानुसार रिपोर्ट काढता येईल. जेणेकरून आपण जेव्हा एखाद्या सभेला / मिटींगला जाल तेव्हा त्या विभागात तुम्ही कोणकोणती कामे केली आहेत याची सविस्तर माहिती तुमच्या हातात असेल. ही माहिती तुम्हाला विभागावर, विषयावर व तारखेसह मिळू शकेल.
८) अॅप सोबत तुमच्या सहा अक्षरी शॉर्ट नावाने (Sender Id) १००० SMS मोफत देत आहोत.
९) ऑनलाईन सपोर्ट
१०) वार्षिक करार पद्धतीत - डेटा बॅकअप, 100% रिप्लेसमेंट, पासवर्ड प्रोटेक्शन, SMS अलर्ट उपलब्ध
** अॅपची ओळख – अंतर्भूत घटक व त्यांचा उपयोग
=> परिचय -
=> संदेश
=> सूचना / विनंती
=> तक्रारी
=> सूचना व विनंती / तक्रार शोध
=> फोटो गॅलरी
=> व्हिडिओ गॅलरी
=> वार्तापत्र
=> मतदार यादी
=> महत्वाचे फोन
=> विकास कामे
=> संपर्क
What's new in the latest 1.8
- सुचना / तक्रारी मध्ये फोटो सुविधा
- दिनविशेष
- व्यवसाय नोंद आणि नागरी सुविधा
लोकनायक - Loknayak APK Information
Old Versions of लोकनायक - Loknayak
लोकनायक - Loknayak 1.8

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!